MP Sanjay Raut Claimed On PM Modi Retirement : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी (MP Sanjay Raut) एक खळबळजनक दावा केलाय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) वारंवार नरेंद्र मोदींना (PM Modi) 75 वर्षांचे झाल्यावर निवृत्त होण्याच्या सूचना देत आहे. राऊत यांनी स्पष्टपणे सांगितलं की, 75 वर्षांनंतर निवृत्तीचा नियम संघाचा आहे. तो मोदींनीच इतर नेत्यांवर लादला होता. आता तोच नियम मोदींनाही लागू होतो.
पंतप्रधान मोदींची निवृत्ती
राऊत म्हणाले, मोदींनी अडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंग यांना वयाच्या 75व्या वर्षानंतर राजकारणातून बाहेर काढलं. आता ते स्वतः सप्टेंबरमध्ये 75 वर्षांचे होत आहेत. वारंवारच्या विदेश दौर्यांवरून स्पष्ट होतं की आता त्यांची निवृत्ती जवळ (PM Modi Retirement) आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोदींना सूचित करत आहे की, त्यांनी आता निवृत्ती घ्यावी. देश सुरक्षित हातात सोपवावा. निवृत्तीनंतरचे जीवन काय असावं यावर भाष्य करत, राऊत म्हणाले, “मोदी-शहा यांच्यासारख्या नेत्यांनी नानाजी देशमुख यांच्याप्रमाणे समाजकारणाकडे वळावं. निवृत्तीनंतर आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी करता येतात.
कर्नाटकातील हसनमध्ये हार्ट अटॅकेने तरुणांचे मृत्यू वाढले ! तपासणीसाठी हॉस्पिटलबाहेर रांगा
75 वर्षांनंतर निवृत्तीचा नियम
या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा आणि खळबळ निर्माण झाली आहे. आगामी काळात भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता निवृत्त व्हावं लागेल, अशी सूचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून वारंवार दिली जात आहे, असा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संघाने तयार केलेला 75 वर्षांनंतर निवृत्तीचा नियम आता नरेंद्र मोदी यांच्यावरही लागू होईल, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.
संजय गायकवाडांना ‘सरकारची ढाल’! गुन्हा दाखलच होणार नाही; रोहित पवारांचा खळबळजनक दावा
मोहन भागवतांच्या यांच्यावर बोलताना राऊत म्हणाले, जेव्हा नरेंद्र मोदी पहिल्यांदा संघ मुख्यालयात गेले, तेव्हा त्यांनी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी यावर चर्चा केली होती. त्यात निवृत्तीचा मुद्दा होता. आता त्यावर अंमलबजावणी करावी लागेल. अमित शहा यांच्याबाबतही ते म्हणाले, कोणी निवृत्तीनंतर काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. नानाजी देशमुख यांच्यासारखे अनेक संघनेते समाजकारणात सक्रिय राहिले. मोदी आणि शहांनीही तसंच केलं तर देशासाठी शुभ संकेत ठरेल.
बाळासाहेब हेच आमचे खरे गुरु
राऊत यांनी दीपक केसरकरांवरही निशाणा साधला, केसरकर कोण? दहा पक्ष फिरून आलेला माणूस. त्याला उद्धव ठाकरेंनी मंत्री केलं, पण तो फक्त मोती तलावातला एक कावळा आहे. शेवटी, राऊतांनी पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण करत म्हटलं, बाळासाहेब हेच आमचे खरे गुरु. आजही त्यांच्यासारखा नेता महाराष्ट्राला दिसत नाही. आमचं त्यांच्या चरणी नेहमीच लीन रहाणं हेच आमचं बळ आहे.