ठाणे : खासदार श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात भाजपकडून जोर लावण्यात येत असल्याचं दिसून येतंय. आज केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा कल्याण दौरा होता. यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन संघटनात्मक निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री ठाकूर म्हणाले,महाराष्ट्रात डबल इंजिनची ताकद आणखी वाढणार असून ज्यांना डबल इंजिन सरकार जाणार असल्याची आशा आहे, त्यांना निराशा पत्करावी लागणार आहे, असा टोला त्यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला यावेळी आहे. ठाकूर यांच्या या दौऱ्यावरुन शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून जोर लावत असल्याचं दिसून येत आहे.
पुढे बोलताना ठाकूर म्हणाले, भाजपला अनेक राज्यांत प्रतिसाद मिळत आहे, विशेषत: ईशान्येकडील राज्यांपाठोपाठ तामिळनाडूतही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच आगामी 2024 च्या निवडणुकीत भाजपचाच विजय होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. छत्रपती शिवाजी महाराज आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या मतदारांचा आम्हाला आशिर्वाद मिळणार असल्याचंही त्यांनी या दौऱ्यादरम्यान स्पष्ट केलं आहे. दरम्यान, भाजपकडून राज्यभरात संघटनेच्या मजबूतीसाठी जोरदार तयारी सुरु आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांकडून ही तयारी सुरु असल्याचं सांगण्यात येतंय.
Viral Video : जोडप्याचा हनिमूनचा व्हिडीओ व्हायरल, आणि घडलं असं काही…
दरम्यान, कल्याण लोकसभा हा विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ आहे. श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातला भाजप नेत्यांचा हा दुसरा दौरा असून भाजपच्या नेत्यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे डोळा आहे, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. अशातच कल्याणमध्ये मंत्री अनुराग ठाकूर यांनी दौरा केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
Thackeray Vs Shinde : पक्षांतरबंदी कायदा, अध्यक्षपद, नबाम रेबिया, ठाकरे गटाने काय युक्तिवाद केला?
या दौऱ्यादरम्यान, केंद्रीय मंत्री ठाकूर यांच्या हस्ते खेलो इंडिया स्पर्धेत विजेतेपद मिळविलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या संघातून ठाण्याच्या संयुक्ता काळे हिने चार सुवर्णपदके आणि एक रौप्य पदक तर किमया कार्लेने तीन कांस्यपदके पटकावली आहेत. त्यांचा सत्कार मंत्री ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन ठाकूर यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून अनुराग ठाकून यांचं ढोल-ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आल्याचं पाहायला मिळालंय.
दरम्यान, शिंदे-ठाकरे वादाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात आज पार पडली. आजच्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तिवाद केला. तर आता उद्या शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकिल हरिश साळवे युक्तिवाद करणार आहेत. त्यामुळे उद्याच्या सुनावणीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.