Supriya Sule meets Santosh Deshmukh family : जर न्यायालयात आरोपींना हजर करायचं असेल तर त्यांचे समर्थक तेथे येतात आणि आम्हाला भीती दाखवतात. त्यांना आम्हाला घाबरवून टाकायचं आहे. (Deshmukh ) परंतु, मी सांगतो आम्ही कुणालाच घाबरणार नाहीत. आमचं कुटुंबही कुणाला घाबरणार नाही आणि मस्साजोग गावही कधी घाबरणार नाही तर आम्ही न्यायासाठी लढत राहणार आहोत. न्यायासाठी कोणत्याही स्थराला जावू असं ठाम मत स्व. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी खासदार सुप्रिया सुले यांना सांगितलं. ते सुप्रिया सुळे गावी भेटण्यासाठी आलेल्या असताना त्यांच्याशी बोलत होते.
त्याचबरोबर आजही अनेक ठिकाणी लोकांना धमकावणं, त्यांना हाणमार करणं सुरूच आहे. त्यामुळे या यंत्रणेतील अनेक पोलिसांकडं घटनेचे सीसीटीव्ही आहेत. परंतु, ते एकही देत नाहीत. समाजातील काही लोकांनी, पत्रकारांनी, आम्हाला सीसीटीव्ही दिले आहेत हे दुर्दैव आहे असंही धनंजय देशमुख यावेळी म्हणाले आहेत. यावेळी बीडचे खासदार बजरंग सोनवणे, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह मस्साजोगचे गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांकडून संपूर्ण हत्याप्रकरणाचा घटनाक्रम जाणून घेतला. संतोष देशमुखांची मुलगी वैभवी हिने आपल्या वडिलांना कशाप्रकारे पाळत ठेवून मारण्यात आले, याचा तपशील सुप्रिया सुळे यांना सांगितला. संतोष देशमुखांची हत्या झाली त्या रात्री 12 वाजेपर्यंत आरोपींचा फोन सुरु होता. आम्ही पोलिसांना ही गोष्ट सांगितली. मात्र, त्यांनी काहीही केले नाही. तुम्ही अंत्यविधी करा, आम्ही आरोपींना शोधतो, असे पोलीस सांगत होते. धनंजय देशमुख यांनी विष्णू चाटेला अनेकदा फोन केले. तो प्रत्येकवेळी तुझ्या भावाला आणून सोडतो, असे सांगत होता. मात्र, मारहाणीत संतोष देशमुखांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यावर विष्णू चाटे याने फोन बंद केला. विष्णू चाटे हा वाल्मिक कराडचा मावसभाऊ होता, असे गावकऱ्यांनी सांगितले.