Video : सुप्रिया सुळेंसमोर संतोषच्या आईचा टाहो; मारेकऱ्यांनाही बायको-मुलं असतील ना?, माझं लेकरू कुठं पाहू?

Supriya Sule at Santosh Deshmukh House In Massajog : आई आई असते. संतोष देशमुखच्या आईच्या डोळ्यांचं पाणी हटत नाही. त्यांच्याशी काय बोलावं शब्द सुचत नाहीत. पण त्यांना मी न्याय मिळवून देणार. आणि यामध्ये त्यांच्या ज्या काही मागण्या त्या पूर्ण करून देण्याची जबाबदारी माझी असं आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी (Santosh Deshmukh ) संतोष देशमुख कुटुंबा्ला दिल आहे. त्या मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची आज मंगळावर (दि. १८ फेब्रुवारी)रोजी सांत्वनपर भेट घेतल्यानंतर बोलत होत्या.
Video : देशमुख हत्या प्रकरणात धस तडजोड करणार नाहीत; मुंडे भेटीवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
यावेळी संतोष यांच्या आईने आपला मुलगा संतोष फक्त गुणी मुलगा होता. तो कधी कुणाच्या नादी कधी लागला नाही. तसंच, कुणाशी कोणतही भांडण कधी केलं नाही. त्यामुळे माझ्या मुलाला काही हाणमार केली असती, पाय-हात मोडला असता तर तो आज पाहायला मिळाला असता. त्याला असं का मारलं असं वेदनादायी प्रश्नही केला. त्या सुप्रिया सुळे यांच्याशी बोलत होत्या.
वैभवी देशमुखची व्यथा
सुप्रिया सुळे यांच्या समोर बोलताना वैभवी देशमुख म्हणाली, “आईला वेड लागल्यासारखं झालंय, त्या दिशेला इथून पुढं कसं कुणाला पाठवणार? आम्ही खूप आनंदी होतो, पण आता कठीण झालंय. कुणी वेळेवर जेवत नाही, झोप लागत नाही, या दुःखातून सावरणं कठीण आहे ताई.
वैभवीच्या या शब्दांनी उपस्थितांचे डोळे पाणावले. घरातील एकमेव आधारस्तंभ गमावल्याने संपूर्ण कुटुंब मानसिक तणावात आहे. यावेळी गावकऱ्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले. “पोलिसांनी लवकर तक्रार घेतली नाही, आम्हाला चुकीच्या दिशेला पाठवलं. पटकन जामीन होईल अशी कलमं पोलिसांनी दाखल केली,” असे गावकऱ्यांनी सांगितले. गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, आरोपींना लवकर अटक झाली नाही तर लोक बाहेर पडू शकणार नाहीत, अशी भावना संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने व्यक्त केली.