Download App

पर्यटनस्थळ खुलं केल्याची माहिती स्थानिक यंत्रणेकडं कशी नव्हती; सर्वपक्षीय बैठकीत सुप्रिया सुळे संतापल्या

पर्यटनस्थळ खुलं केल्याची माहिती स्थानिक यंत्रणेकडं कशी नाही? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वपक्षीय बैठकीत

  • Written By: Last Updated:

Supriya Sule on Pahalgam Terrorist Attack : अवघ्या देशाचे नंदनवन असलेल्या दक्षिण जम्मू आणि काश्मीरमधील मिनि स्वित्झर्लंड ओळख असलेल्या पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अवघा देश स्तब्ध होऊन गेला आहे. मात्र, दहशतवादी हल्ल्यावेळी दहशतवाद्यांकडून उच्चारलेल्या शब्दांमुळे देशामध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. (Attack) यानंतर ‘धर्म पुछा, जाति नही’ असं म्हणत काही लोकांनी विखारी प्रचाराला प्रारंभ करत स्थानिक काश्मिरी लोकांना सुद्धा टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काही व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

पर्यटनस्थळ खुलं केल्याची माहिती स्थानिक यंत्रणेकडं कशी नाही? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वपक्षीय बैठकीत उपस्थित केला आहे. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात काल संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक दिल्लीत पार पडली. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी हा प्रश्न उपस्थित केला. पुण्यात टुर ऑपरेटरला कळतं, पुणे आणि मुंबईच्या टुर ऑपरेटरकडून बुकिंग घेतलं जातं. पण स्थानिक यंत्रणेला माहिती नाही? याबद्दल तिथल्या स्थानिक सुरक्षा आणि यंत्रणांना काहीच कसं समजलं नाही? असंही यावेळी त्यांनी म्हंटलं आहे. तर पहलगाम हल्ल्याबाबत चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी इंडियन युनियन मुस्लिम लीगचे राज्यसभा खासदार हैरिस बिरान यांनी केली आहे.

 

सरकारने फक्त राष्ट्रीय हिताचा विचार करावा; प्रचार करण्यात..पहलगाम हल्ल्यावरून ठाकरे गटाचा संपादकीयमधून सल्ला

follow us