Download App

MPSC Exam विद्यार्थ्यांसाठी खुशखबर : ७५ हजार पदभरतीसाठी वयोमर्यादा वाढली!

  • Written By: Last Updated:

मुंबई : कोरोना काळात प्रसिद्ध न झालेल्या जाहिराती त्याचबरोबर प्रशासकीय कारणांमुळे रखडलेल्या परीक्षा आणि ७५ हजार पदांच्या प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती यामध्ये वयोमर्यादा संपलेल्या उमेदवारांसाठी राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. वयाच्या सवलतीबाबत शासन स्तरावर सकारात्मक निर्णय झाला असून सुधारित शासन निर्णय लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामळे राज्यातील स्पर्धा परीक्षेची (Competitive Exam) तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना (Student) फायदा होणार आहे.

या संदर्भात विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांनी राज्य शासनाच्या अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांना पत्र पाठवले होते. तसेच शुक्रवारी (दि. ३) रोजी राज्य विधी मंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात मंत्री उदय सामंत आणि गुलाबराव पाटील यांनी लवकरात लवकर शासन आदेश निर्गमित करण्याची मागणी केली. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यासंदर्भात निर्णय निर्गमित करण्याचे संबंधित विभागाला आदेश दिले आहेत.

Eknath Shinde : मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी दिली महत्वाची अपडेट..

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या पण वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांसाठी २ वर्षे वय सवलतीची वाढीव संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच नुकतीच एमपीएससीद्वारे राज्यसेवा पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्याची फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे १७ डिसेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयमध्ये सुधारणा करण्यात यावी. तसेच संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब व गट-क या पदासाठी फॉर्म भरण्याची लिंक बंद केली आहे. त्यामुळे वय सवलत देऊन ज्यांची वयोमर्यादा ओलांडली आहे. त्यांच्यासाठी ही लिंक खुली करून देण्याची मागणी करण्याच आली आहे. या पदासाठी येत्या ३० एप्रिल २०२३ रोजी परीक्षा होणार आहे.

Tags

follow us