MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गेल्या वर्षी 7 ते 9 मार्च दरम्यान घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2021 चा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला.या परीक्षेत बीड जिल्ह्यातील माजलगावच्या सोनाली अर्जुन म्हात्रे या शेतकऱ्याच्या मुलीने एमपीएससी परीक्षेत बाजी मारली आहे. सोनालीने सर्वसाधारण यादीत तिसरी तर मुलींमध्ये राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. सोनालीच्या या यशामुळे परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोनाली मात्रेचे वडील शेतकरी असून एका शेतकरी कन्येने हे यश मिळवल्याने तिचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे. (mpsc-final-result-sangli-pramod-patil-first-beed-sonali-matre-first-among-girls-mpsc-list)
तर प्रमोद बाळासाहेब चौगुले याने सर्वसाधारण उमेदवारांमधून राज्यात पहिला क्रमांत पटकावला आहे. तसेच विशाल महादेव यादव हा मागासवर्ग उमेदवारांमधून राज्यात प्रथम आला आहे. या वर्षी 28 फेब्रुवारी रोजी या परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली होती आणि त्यानंतर आता याच मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल एमपीएससीकडून संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.
‘एक दिल टुकडे हजार, कोई कहाँ गिरा’.. बावनकुळेंनी शायराना अंदाजात केलं महाविकासआघाडीचं भाकीत
निकालाच्या आधारे शिफारस पात्र न ठरलेल्या उमेदवारांना उत्तरपुस्तिका, उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची असल्यास गुणपत्रके त्यांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध झाल्याच्या दिनांकापासून 10 दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. यासंदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना दिल्या असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिली.
जा.क्र.31/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021ची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://t.co/qLkuxqJCw2 https://t.co/gyrDEDm6gt
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) June 15, 2023
संपूर्ण यादी वाचण्यासाठी महराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटला भेट द्या…