MPSC पेपर फुटीबाबत तपासात धक्कादायक माहिती समोर; परीक्षेच्या 2-3 दिवस आधीच पेपरफुटल्याच निष्पन्न

MPSC paper leak च्या औषध निरीक्षक पदाच्या भरती परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात तपासातून धक्कादायक माहिती समोर येत आहे.

MPSC

साडेसहा लाख विद्यार्थ्यांचा जीव लागला टांगणीला; राज्यसेवा पूर्व अन् संयुक्त पूर्व परीक्षेला मुहूर्त लागेना

MPSC paper leak Shocking details emerged during investigation paper was leaked two-three days prior to exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या भरती परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात तपासातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 22 मार्च रोजी झालेल्या परीक्षेच्या दोन ते तीन दिवस आधीच प्रश्नपत्रिका फुटल्याचे गुन्हे शाखेच्या तपासातून समोर आल्याचे सांगितले जात आहे.

Video एक बिस्किट्स घेऊ? समय रैनाच्या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर अन् एकच हशा पिकला

दरम्यान, 22 जुलै रोजी जाहीर करण्यात आलेल्या 488 उमेदवारांच्या अंतरिम गुणवत्ता यादीमुळेही या प्रकरणाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. या परीक्षेत बहुतांश उमेदवारांना 200 पैकी 120 गुणांपर्यंतच मजल मारता आली. मात्र, काही उमेदवारांनी 120 पेक्षा अधिक गुण मिळवत यादीत वरचे स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे, यापैकी काही उमेदवारांची काही महिन्यांपूर्वी झालेल्या इतर स्पर्धा परीक्षांमधील कामगिरी तुलनेने सामान्य होती आणि त्यांचे क्रमांकही हजारांच्या पुढे होते. त्यामुळे अशा उमेदवारांच्या कामगिरीचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

कौटिल्य अकॅडमीच्या संचालकाला अटक

या प्रकरणात नंदुरबार येथील कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या संपर्कात असलेल्या काही परीक्षार्थींना प्रश्नपत्रिकेचा संच देण्यात आला होता का, याचा तपास सुरू आहे. पेपर फुटल्यानंतर प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲपवरही प्रसारित झाल्याचा दावा एका तक्रारदार परीक्षार्थीने केला आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका केवळ एका उमेदवारापर्यंतच पोहोचली होती, या दाव्यावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

नेपाळमध्ये अडकलेल्या साताऱ्यातील 10 महिला पर्यटक सुरक्षित; प्रशासनाकडून हेल्पलाईन क्रमांक जारी

गुन्हे शाखेकडून प्रवीण पाटील यांच्यासह या प्रकरणात अटक झालेल्या MPSCचे अवर सचिव अभिजीत लेंडवे, परीक्षेचे समन्वय अधिकारी विश्वेश्वर नकाते आणि सहाय्यक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे यांच्या बँक खात्यांमधील आर्थिक व्यवहारांची तपासणी केली जात आहे. या व्यवहारांमधून आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येते का, याकडे लक्ष लागले आहे.

MPSCकडून पेपरफुटीची कबुली; फेरपरीक्षा होणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने औषध निरीक्षक पदाची प्रश्नपत्रिका फुटल्याचे मान्य केले असून, या परीक्षेसाठी पुन्हा परीक्षा घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणात नंदुरबारमधील चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणात कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील हे महत्त्वाचे नाव ठरले आहे. त्यांच्या अटकेनंतर त्यांनी आणखी कोणत्या उमेदवारांना प्रश्नपत्रिका किंवा प्रश्नांचा संच दिला होता का, याचा शोध घेणे तपास यंत्रणांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

15 वर्षांपासून नंदुरबारमध्ये अकॅडमी

औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणामुळे नंदुरबारमधील कौटिल्य अकॅडमी सध्या चर्चेत आली आहे. ही संस्था गेल्या सुमारे 15 वर्षांपासून नंदुरबार शहरात कार्यरत असल्याची माहिती आहे. मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये जाऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करणे स्थानिक विद्यार्थ्यांना शक्य व्हावेच असे नाही. त्यामुळे नंदुरबारमध्येच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने अकॅडमी सुरू करण्यात आल्याचे सांगितले जाते. अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील हे नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी गावचे रहिवासी आहेत.

दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याचा दावा

उपलब्ध माहितीनुसार, प्रवीण पाटील यांची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसल्याचे सांगितले जाते. नंदुरबारमध्ये अभ्यासिका आणि MPSC पूर्वतयारी वर्ग सुरू करणाऱ्या सुरुवातीच्या संस्थांपैकी कौटिल्य अकॅडमी असल्याचा दावा केला जातो. अकॅडमीच्या माध्यमातून आतापर्यंत दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केल्याचे सांगितले जाते. मात्र, औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामुळे आता अकॅडमीची भूमिका तपासाच्या केंद्रस्थानी आली आहे. या प्रकरणात नेमके काय घडले, प्रश्नपत्रिका कोणाकोणापर्यंत पोहोचली आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग होता का, याची उत्तरे गुन्हे शाखेच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहेत.

Exit mobile version