MPSC’s State Services and Combined Group B & C exams will online and held 2–3 times a year : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता एमपीएससीच्या महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातुन दोन किंवा अधिक वेळा घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या तिनही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
हा बदल 2017 पासून लागू करण्यात येणार आहे. तर आतापर्यंत पूर्व परीक्षा वर्षातून केवळ एकदाच घेतल्या जात होत्या. त्या परीक्षांना लाखो उमेदवार बसत होते. परंतु जागांच्या मर्यादेमुळे बहुतांश उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी पात्रता मिळवता येत नव्हती. वर्षभर अभ्यास करूनही एकाच संधीवर भवितव्य अवलंबून असल्याने उमेदवारांवर प्रचंड मानसिक दडपण होतं. त्यामुळे त्यांना जास्त संधी उपलब्ध करून देऊन अनावश्यक ताण दूर करणे हा या निर्णयामधील मुख्य उद्देश असल्याचं आयोगाने स्पष्ट केलं आहे.
