मोठी बातमी! MPSC च्या राज्यसेवेसह गट-ब, क पूर्व परीक्षा ऑनलाईन अन् वर्षातून 2,3 वेळा होणार

MPSC's exams च्याराज्यसेवेसह गट-ब, क पूर्व परीक्षा या वर्षातुन दोन किंवा अधिक वेळा घेण्यात येणार आहेत.

MPSC

MPSC’s State Services and Combined Group B & C exams will online and held 2–3 times a year : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता एमपीएससीच्या महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातुन दोन किंवा अधिक वेळा घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या तिनही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

LPG पुरवठ्याबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! निर्बंध हटवल्याने व्यावसायिक अन् औद्योगिक क्षेत्रांना दिलासा

हा बदल 2017 पासून लागू करण्यात येणार आहे. तर आतापर्यंत पूर्व परीक्षा वर्षातून केवळ एकदाच घेतल्या जात होत्या. त्या परीक्षांना लाखो उमेदवार बसत होते. परंतु जागांच्या मर्यादेमुळे बहुतांश उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी पात्रता मिळवता येत नव्हती. वर्षभर अभ्यास करूनही एकाच संधीवर भवितव्य अवलंबून असल्याने उमेदवारांवर प्रचंड मानसिक दडपण होतं. त्यामुळे त्यांना जास्त संधी उपलब्ध करून देऊन अनावश्यक ताण दूर करणे हा या निर्णयामधील मुख्य उद्देश असल्याचं आयोगाने स्पष्ट केलं आहे.

MPSC चा मोठा निर्णय! राज्य सेवा मुख्य परीक्षेत 2027 पासून वैकल्पिक विषय नसणार

त्याचबरोबर या तीनही परीक्षा आता ओएमआर शीटऐवजी कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे परीक्षा ऑनलाईन आणि अधिक पारदर्शक पद्धतीने पार पडतील.पूर्व परीक्षा एकापेक्षा जास्त घेतली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन आयोगाने गुणांचं समाणीकरण करण्याची पद्धत देखील निश्चित केली आहे. त्यामुळे वर्षातून दोन किंवा अधिक वेळा होणाऱ्या पूर्व परीक्षांपैकी कोणत्याही एका पूर्व परीक्षेत उमेदवार पात्र ठरतील. ते उमेदवार त्या वर्षाच्या संबंधित मुख्य परीक्षेसाठी पात्र असतील. पूर्व परीक्षा दोन किंवा अधिक वेळा होणार असली तरी संबंधित सेवांची मुख्य परीक्षा मात्र वर्षातून एकदाच होईल.

 

 

follow us