MSRDC : मुंबई ते नागपूरला जोडणारा हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग (Samrudhi Highway) हा उद्घाटनापासूनच नेहमीच चर्चेत राहिला. या नव्या महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच आहेत. अशातच आता समृद्धी महामार्गावर खिळे ठोकण्यात आल्याचं समोर आलंय. या खिळ्यांमुळे अनेक गाड्यांचे टायर फुटल्याने चालकांनी संतापही व्यक्त केलायं. या संपूर्ण प्रकरणावरुन अखेर एमएसआरडीसीकडून (MSRDC) स्पष्टीकरण देण्यात आलंय. समृद्धी महामार्गावर खिळे नाहीत, तर महामार्गाला पडलेल्या भेगा बुजविण्यासाठी त्यात रसायन भरण्यासाठी लावलेले नोझल असल्याचं एमएसआरडीडीसकडून सांगण्यात आलंय.
‘सैयारा’च्या म्युझिक अल्बमने घडवला जागतिक इतिहास, वायआरएफकडून एक्सटेंडेड अल्बम सादर
“हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग येथे (साखळी क्रमांक ४४२+४६०) वरील मुंबई मार्गीकेवर पहिल्या व दुसऱ्या लेनमध्ये साधारण १५ मीटर लांबीमध्ये सूक्ष्म तडे (Minor Cracks) आढळल्याने देखभाल व दुरुस्ती अंतर्गत Preventive Maintenance Measures म्हणून Epoxy Grouting द्वारे सूक्ष्म तडे (Minor Cracks) भरण्याचे काम करण्यात आलेले आहे. सूक्ष्म तडे (Minor Cracks) भरण्याचे काम करत असताना अॅल्युमिनिअमचे नोजल्स फिक्स करावे लागतात. काम करते वेळेस (Traffic Diversion) व्यवस्था करण्यात आली होती. दि. ०९/०१/२०२५ रोजी रात्री ११:३० वाजता काम पूर्ण झाले. त्यानंतर वेगाने येत असलेली काही वाहने पहिल्या लेनमध्ये डायव्हर्जन ओलांडून नोजल्स वरुन गेल्यामुळे ३ गाड्यांचे टायर पंक्चर झाल्याची घटना दि. १०.०९.२०२५ रोजी रात्री १२:१० मिनिटाच्या सुमारास झाली. त्यानंतर वाहतूक नियंत्रण कक्षाला संदेश मिळाल्यानंतर महामार्ग गस्त वाहन (RPV) रात्री १२:३६ मिनिटांनी घटनास्थळी पोहचले होते. या ठिकाणी कोणताही अपघात अथवा जिवित हानी झालेलो नाही. Epoxy grouting साठी लावण्यात आलेले अॅल्युमिनिअमचे नोजल्स दि. १०,०१,२०२५ रोजी सकाळी ०५:०० वाजता काढण्यात आले असून सद्यस्थितीत वाहतूक सुरळीत चालू आहे. सदर ठिकाणी Traffic Diversion ची सर्व समावेशक सुरक्षा व्यवस्था नसल्याचे दिसून आले. त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येत असल्याचं एमएसआडीसीकडून सांगण्यात आलंय.
दरम्यान, समृद्धी महामार्गावर खिळे ठोकण्यात आल्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले, त्यानंतर या खिळ्यांमुळे अनेक वाहने पंक्चर झाले होते. या प्रकारामुळे वाहनचालकांकडून संताप व्यक्त केला जात होता. या प्रकारानंतर अखेर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून खुलासा करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गावर खिळे ठोकण्यात आले नसल्याचा दावा एमएसाआरडीसीकडून करण्यात आलायं.