काय सांगता…अंबानींनी चक्क मोदींना गिफ्ट केले 1500 कोटींचं घर

Mukesh Ambani Gift To His Employee 1500 Crore House : मोठं मोठे उद्योजक, सेलिब्रिटी, कलाकार यांचे शाहीजीवन आजवर आपण ऐकले असतील. या अब्जाधीशांची लाइफस्टाइल असो वा त्यांच्या कृती या नेहमीच हटके असतात. असाच एक प्रकार समोर आला आहे. नुकतेच प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आपल्या एका सहकाऱ्याला चक्क 1500 कोटींचे घर गिफ्ट केले आहे. हे […]

Untitled Design   2023 04 25T220739.918

Untitled Design 2023 04 25T220739.918

Mukesh Ambani Gift To His Employee 1500 Crore House : मोठं मोठे उद्योजक, सेलिब्रिटी, कलाकार यांचे शाहीजीवन आजवर आपण ऐकले असतील. या अब्जाधीशांची लाइफस्टाइल असो वा त्यांच्या कृती या नेहमीच हटके असतात. असाच एक प्रकार समोर आला आहे. नुकतेच प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आपल्या एका सहकाऱ्याला चक्क 1500 कोटींचे घर गिफ्ट केले आहे. हे ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित झाला असाल, मात्र हे खरं आहे. मुकेश अंबानी यांनी रिलायंस इंडस्ट्रीजचे कर्मचारी आणि जवळचे सहकारी मनोज मोदी यांना हे घर गिफ्ट केलं आहे.

मोदी अंबानींचे राईट हॅन्ड
रिलायंस इंडस्ट्रीजचे सर्वात विश्वासू कर्मचाऱ्यांपैकी एक अशी मनोज मोदी यांची खास ओळख आहे. विशेष म्हणजे मुकेश अंबानी यांचे राइट हँड म्हणून देखील ते ओळखले जातात. सूत्रांकडून समजलेल्या अधिक माहितीनुसार मनोज मोदी यांना जे घर गिफ्ट म्हणून देण्यात आलं आहे ते 22 मजली इमारत आहे. इतकेच नाही तर ही इमारत प्राइम लोकेशन नेपीन सी रोडवर आहे. मुकेश अंबानींनी गिफ्ट दिलेल्या या इमारतीला व़ंदावन असे नाव देण्यात आले आहे.

एवढी महागडी इमारत…
या इमारतीचा प्रत्येक फ्लोअर हा आठ हजार स्क्वेअर फुट आहे. तसेच या इमारतीचे क्षेत्र 1.7 लाख स्क्वेअर फुट आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल या इमारतीच्या पहिल्या 7 मजल्यावर केवळ कार पार्किंग साठी जागा राखीव ठेवण्यात आली आहे. दरम्यान मनोज मोदी यांनी मुंबईतील आपले दोन अपार्टमेंट विकले आहेत. ज्याच्या डॉक्युमेंटवरून त्यांच्या किंमत 41.5 कोटी रुपये होती.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचे निधन

लक्झरी इमारत
या इमारतीतील काही फर्निचर हे इटलीहून मागवण्यात आलं आहे. या इमारतीवर इन्फनाईट स्वीमिंग पूल देखील आहे. या इमारतीवरुन अरबी समुद्राचं विहंगम दृश्य दिसतं. पार्टी रुम, फॉर्मल मीटिंग एरिया, स्पा, 50 प्रेक्षक बसण्याची क्षमता असलेलं थिएटर अशा अनेक सुविधा देखील या इमारतीत आहेत.

Exit mobile version