Download App

लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार पहिले दोन्ही हप्ते, अजित पवारांची मोठी घोषणा

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मानधन रक्षाबंधन सणापूर्वी एकत्रित रित्या बॅंक खात्यावर जमा होईल- अजित पवार

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar on Ladki Bahin Yojana : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेबाबत (Ladki Bahin Yojana) आज मोठी घोषणा केली. लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मानधन रक्षाबंधन सणापूर्वी एकत्रित रित्या बॅंक खात्यावर जमा होईल, अशी घोषणा त्यांनी केली. ते गडचिलोरीमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.

विशाळगडावर यासीन भटकळचं वास्तव्य! संभाजीराजेंच्या आरोपांनंतर मुश्रीफांनी मौन सोडलं 

सुरजागड इस्पात या खासगी कंपनीच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज गडचिरोलीत आले होते. यावेळी संबोधित करताना ते म्हणाले, गडचिरोली हा दुर्गम भाग असला तरी निसर्गाने हा परिसर समृद्ध केला आहे. सुरजागड येथील खाणीत हजारो कोटी रुपयांचे लोहखनिज आहे. आधी लॉयड्स मेटल्सने काम सुरू केले, आता सूरजागड इस्पात या कंपनीने कारखाना सुरू केला आहे. या कारखान्यासाठी आपली वडिलोपार्जित 150 एकर जमीन दान केलेल्या धर्मरावबाबा आत्राम यांचे विशेष कौतुक करतो. तर उर्वरित जागा कंपनीने खरेदी केल्याची माहिती अजितदादांनी दिली.

पिंपरी-चिंचवडनंतर पुण्यातही मोठा धमाका, अजितदादा गटाचे दीपक मानकरही शरद पवारांच्या गळाला? 

पुढं बोलतंना ते म्हणाले, महायुती सरकारने सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून मिळणारे 1500 रुपये मानधन महिलांना आर्थिकदृष्ट्या बळकट करेल, त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करावेत, असं ते म्हणाले.

तर 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान पहिला निधी देऊ, असा आमचा प्रयत्न आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच, ज्यांचे अर्ज 31 ऑगस्टपर्यंत येतील, त्यांचे अर्ज जुलैमध्ये आले असं समजून त्यांनाही त्याच्या पुढच्या महिन्यात जुलै आणि ऑगस्टचे पैस आम्ही देणार आहोत. त्यामुळं कोणाचेही नुकसान होणार नसल्याचं फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी पात्रता निकष काय?
1. महिला महाराष्ट्रातील रहिवासी असावी.
2. विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला पात्र.
3. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
4. 60 वर्षांपेक्षा जास्त वय असेल तर लाभ मिळणार नाही.

कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा पुरावा, निवास प्रमाणपत्र, बँक पासबुक, अर्जदाराचा फोटो, निवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र

follow us