भाजपची मते आम्हाला मिळत नाहीत…; DCM अजित पवारांचा दावा तरी काय?

भाजपची मते आम्हाला मिळत नाहीत…; DCM अजित पवारांचा दावा तरी काय?

Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अजित पवारटाला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं. भाजपची (BJP) मते ट्रान्सफर न झाल्याने त्यांच्या उमदेवारांचा तीन जागांवर पराभव झाल्याचा दावा करण्यात येत आहे. यावर आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) भाष्य केलं. लोकसभा निवडणुकीत भाजपची मत राष्ट्रवादीला ट्रान्सफर झाली नसल्याच्या दाव्यात कोणतंही तथ्य नसल्याचं अजित पवार म्हणाले.

शरद पवारांचा गव्हाणेंवर ‘डाव’ : अजितदादांना आव्हान, महेश लांडगेंना टेन्शन 

अजित पवारांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी बोलतांना ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आम्ही महायुतीकडे माढा आणि अहमदनगर या दोन जागा मागितल्या होत्या. या जागा आम्हाला मिळाल्या असत्या तर दोन्ही ठिकाणी महायुतीचे खासदार निवडून आले असते. भाजप आणि राष्ट्रवादीची मते एकमेकांना ट्रान्सफर होत नाहीत असा आरोप केला जातो. मात्र रायगड मतदारसंघात आम्हाला भाजपची मते मिळाली. त्यामुळे या आरोपात कोणतेही तथ्य नाही, असे अजित पवार म्हणाले.

शरद पवारांचा गव्हाणेंवर ‘डाव’ : अजितदादांना आव्हान, महेश लांडगेंना टेन्शन

लोकसभेतील पराभवानंतर अजित पवार गटाने विधानसभेची तयारी सुरू केलाी. यावेळी बोलतांना अजित पवारांनी महायुतीच्या संभाव्य जागावाटपावरही भाष्य केलं. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीतील तीनही घटक पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील. त्याआधी राष्ट्रवादी कॉंग्रेस सर्वच जागांवर एक सर्वेक्षण करेल. त्यात पक्षाची कुठे किती ताकद आहे हे समजेल. सध्या काही जागा आमच्या ताब्यात नसल्या तरी आम्ही तिथे निवडून येऊ शकतो. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर तेथील राजकीय परिस्थितीचा अंदाज येईल. त्या आधारावर महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस जागांबाबत दावा करेल, असं ते म्हणाले.

दरम्यान, अजित पवारांना पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह सुमारे 24 पदाधिकाऱ्यांनी आज शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला. पिंपरी-चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे या पक्षप्रवेशामुळे त्यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube