‘या’ महिलांना महिलांना मिळणार नाहीत लाडक्या बहिणीचे पैसे; आदिती तटकरेंनी सांगितलं

ज्या महिलांच्या कुटुंबियांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक आहे, अशा महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही, असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी सांगितलंय.

Aaditi Tatkare

Aaditi Tatkare

Mukhyamantri Ladki Bahin Yojna : विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना (Mukhyamantri Ladki Bahin Yojna) सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारने लाडक्या बहिणींनी दरमहा 1500 रुपये दिले. याच योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आलीयं. या योजनेचा गैरवापर करुन काहींनी पैसे घेतल्याच्या तक्रारी आल्याने आता पुन्हा सर्वच अर्जांची फेरतपासणी होणार असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी दिलीयं.

नगरकर हुशार…काम करणाऱ्यालाच पुन्हा संधी; आमदार जगतापांची विरोधकांवर टोलेबाजी

या योजनेसाठी अर्ज केलेल्या काही महिलांचे अर्ज मंजूर होणं बाकी असून त्याची छाननी सरकारकडून करण्यात येत आहे. अशातच आता अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न
असलेल्या महिलांना लाडकी बहिण योजनाचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे आता फेरतपासणीमध्ये असे अर्ज आढळून आले तर त्या महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नसल्याचंही आदिती तटकरे यांनी केलंय.

11 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण, ‘गडचिरोली लवकरच नक्षलवादमुक्त होईल’; मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची पात्रता काय?
महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक
विवाहित, विधवा, घटस्फोटीत, कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला
वय वर्षे 21 वर्षे पूर्ण व कमाल वय 65 असावे
आधार लिंक असलेले बॅंक खाते
कुटुंबाचे अर्थिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे.

Exit mobile version