मुंबई कल्याण महापालिका निवडणूक बोटावरची शाई पुसली, बोगस मतदानाचा धोका वाढला; विरोधक आक्रमक

KDMC Election : राज्यात 29 महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरु असून मात्र अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याने राज्य निवडणूक

KDMC Election

KDMC Election

KDMC Election : राज्यात 29 महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरु असून मात्र अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याने राज्य निवडणूक आयोगावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. तर दुसरीकडे आता एक धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कल्याण – डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी मतदारांच्या बोटाला लावण्यात आलेली शाई पुसली जात असल्याचे प्रकार समोर आल्याने आता विरोध चांगलेच संतापले आहे. या प्रकरणात कल्याण-डोंबिवली महापालिकेतील (Kalyan-Dombivli Municipal Corporation) उमेदवार उर्मिला तांबे यांनी तक्रार देखील दाखल केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, कल्याण- डोंबिववी महापालिकेतील प्रभाग क्रमांक 9 मध्ये मतदान करताना बोटाला लावलेली शाई पुसली जात असल्याचे समोर आले आहे. यानंतर मनसेच्या उमेदवार उर्मिला तांबे आणि काँग्रेस उमेदवार माधवी चौधरी यांनी या संदर्भात तक्रार देखील दाखल केली आहे. हा काय प्रकार? असे प्रकार करायचे असतील तर निवडणुका घेता कशाला? असा संतप्त सवाल तांबे यांनी विचारला आहे.

मुंबईत भाजप 90 जागा जिंकणार; चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा-

तर दुसरीकडे मुंबईत देखील असाच प्रकार घडल्याने राज्य निवडणूक आयोगाकडून यंदा मतदानासाठी शाईऐवजी मार्करचे किट उपलब्ध करुन देण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मार्कर 2012 पासून प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वापरला जात असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version