Download App

लोकलनं प्रवास करण्याचा प्लान असेल तर मुंबईकरांनो थांबा; रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवर ‘मेगाब्लॉक

ट्रान्स हार्बरवर ठाणे ते वाशी / नेरूळ अप, डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 11 वाजून 10 मिनिटांपासून ते

  • Written By: Last Updated:

Local Megablock : उद्याच्या रविवारी मुंबईकरांनो जर तुम्ही लोकलनं प्रवास करण्याचा विचार करत असाल तर नियोजन करण्याचा विचार करत असाल, तर थोडं थांबा. उद्या, रविवार, (दि. ११ जानेवारी २०२५) रोजी मुंबई लोकलच्या (Local Megablock) तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. उपनगरी रेल्वे मार्गावरील रूळ दुरुस्ती, तसंच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी हा मेगाब्लॉक घेतला जाणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

CM चंद्रपुरात सुधीरभाऊ मुंबईत, कार्यक्रमालाही दांडी; मुनगंटीवारांनी सगळचं सांगितलं..

मध्य रेल्वेवर विद्याविहार ते ठाणे पाचव्या आणि सहाव्या मार्गिकवर, तर ट्रान्स हार्बरवर मार्गावरील ठाणे ते वाशी/नेरूळ अप-डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच, पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव अप-डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

सहाव्या मार्गिकेवर ब्लॉक

रविवार, 11 जानेवारी 2025 रोजी विद्याविहार ते ठाणे, अशा पाचव्या- सहाव्या मार्गिकेवर मेगाब्लॉक असेल. सकाळी 8 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. त्यावेळेत ठाणे येथून सुटणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्या अप जलद मार्गावर वळवण्यात येतील, तर एलटीटीकडे जाणाऱ्या गाड्या विद्याविहार स्थानकावर सहाव्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील, तर डाऊन मार्गानं जाणाऱ्या मेल/एक्स्प्रेस गाड्या विद्याविहार स्थानकावर डाऊन जलद मार्गावर धावतील आणि पाचव्या मार्गावर वळवली आहेत. पटना-एलटीटी, काकीनाडा-एलटीटी, एलटीटी- गोरखपूर, एलटीटी-जयनगर पवन आणि एलटीटी-तिरुअनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस विलंबानं धावणार आहे.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

ट्रान्स हार्बरवर ठाणे ते वाशी / नेरूळ अप, डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 11 वाजून 10 मिनिटांपासून ते दुपारी 4 वाजून 10 मिनिटांपर्यंत हा मेगाब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत पनवेल/वाशी/नेरूळ येथून ठाणेकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. ठाणेहून वाशी/नेरूळ/ पनवेलसाठी जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा या काळात बंद राहतील.

जलद मार्गावर मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वेवर रविवार, 11 जानेवारी 2025 रोजी सांताक्रूझ-गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील सर्व सेवा धीम्या मार्गावर चालवल्या जातील. ब्लॉकदरम्यान काही उपनगरी गाड्या रद्द राहणार आहेत, तर काही अंधेरी आणि बोरिवली लोकल हार्बर मार्गावरील गोरेगाव स्थानकापर्यंत चालवल्या जातील.

दिवा-वसई रोडदरम्यान विशेष ब्लॉक

दिवा-वसई रोड मार्गावरील रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेवरील दिवा-वसई रोड विभागातील पुलाच्या तुळ्या उभारणीसाठी जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात रात्रकालीन वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दिवा – वसई रोड दरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात येणार आहेत.

follow us