Download App

शिंदे-फडणवीस सरकारला ‘मॅट’चा मोठा दणका! महसूल अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती

MAT On State Govt Transfer Decision : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis government) महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकाराने (मॅट) मोठा दणका दिला आहे. सरकारने राज्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या (Revenue Officer)बदल्या केल्या होत्या. त्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर मॅट न्यायालयाने निर्णय दिला आहे. हा निर्णय बदल्यांच्या विरोधात दिला आहे. हा एकप्रकारे शिंदे-फडणवीस सरकारला मोठा धक्का मानला जात आहे. सरकारने केलेल्या या बदल्यांमध्ये अनियमितता असल्याचं निरीक्षण मॅटकडून नोंदवलं आहे. त्यावरुन मॅटने शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेला बदल्यांचा निर्णय रद्द केला आहे. या निर्णयामुळे राजकीय (Political) वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. (mat-on-state-govt-transfer-decision-revenue-officers)

फडणवीस यांचा दौरा पण चर्चा पृथ्वीराज चव्हाण यांच्या पराभवाची

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve)यांनी महसूल विभाग, कृषी विभाग, वन विभागात झालेल्या बदल्यांवरुन सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी महसूल विभागातील 66 अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर राज्यभर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता याबाबत मॅटकडून सरकार आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दणका देण्यात आला आहे.

फडणवीस यांचा दौरा पण चर्चा पृथ्वीराज चव्हाण यांच्या पराभवाची

महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्यांना आता स्थगिती देण्यात आली आहे. तर कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन करत या बदल्या करण्यात आल्याचे निरीक्षण यावेळी मॅटकडून नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे हा शिंदे-फडणवीस सरकारसह महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे.

Tags

follow us