फडणवीस यांचा दौरा पण चर्चा पृथ्वीराज चव्हाण यांच्या पराभवाची

फडणवीस यांचा दौरा पण चर्चा पृथ्वीराज चव्हाण यांच्या पराभवाची

Prithviraj Chavan : Devendra Fadanvis :  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांची सभा माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या दक्षिण कराड या विधानसभा मतदारसंघात पार पडली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. विशेष म्हणजे या सभेचे आयोजन भाजप नेते अतुल भोसले यांनी केले होते. अतुल भोसले यांनी 2014 आणि 2019 साली पृथ्वीराज चव्हाणांच्या विरुद्ध विधानसभा निवडणूक लढवली होती. आता पुन्हा एकदा 2024 च्या विधानसभेसाठी सज्ज झाले आहे. यावेळी भाजप नेते व आमदार जयकुमार गोरे यांनी कोणत्याही परिस्थितीत अतुल भोसलेंना आमदार करणारच असे म्हटले आहे.

राज्यभरामध्ये भाजपचे ‘मोदी@9’ हे अभियान सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपचे हे अभियान सुरु आहे. या अभियानांतर्गत ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजप नेते जयकुमार गोरेंनी आपल्या भाषणामध्ये अतुल भोसलेंचे तोंडभरुन कौतुक केले आहे. अतुल भोसलेंनी तेव्हाच्या आजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचे काम केले. जय-पराजयाचा कोणताही परिणाम या युवकाने केला नाही आणि अतिशय ताकदीने निवडणुका लढवल्या. आपल्या सगळ्यांना अतुलबाबांना आमदार झालेले पहायचे आहे, असे गोरे म्हणाले.

अधिकाऱ्यांना तंबी देण्याची मंत्री विखे पाटलांवर आली वेळ; वाळू विक्री केंद्रावर नक्की काय झालं?

तसेच अतिशय कमी वेळेमध्ये त्यांनी हा भव्य मेळावा घेतला. फडणवीस साहेबांना तुम्हाला आमदार झालेले पहायचे आहे. रात्री बारा वाजता आम्ही बरोबर होतो तेव्हा देखील ते म्हणाले की, अतुल आमदार झाला पाहिजे. मोदीजींच्या योजनांचा अभ्यास फडणवीससाहेबांनतर कुणाचा असेल तर तो आपला आहे, असे म्हणत फडणवीसांसमोरच गोरे यांनी अतुल भोसलेंचे कौतुक केले.

देवेंद्र फडणवीस मोठं नेतृत्व, कोणीच डॅमेज करु शकत नाही; बावनकुळेंनी भरला दम

दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पराभाव होणार असल्याचा अंदाज एका सर्व्हेमध्ये वर्तविण्यात आला आहे. ‘न्यूज एरिना इंडिया’  या राजकीय संस्थेने हा सर्व्हे केला आहे. कर्नाटकमधील अचूक सर्व्हेमुळे ही सर्वेक्षण संस्था चर्चेत आली होती.  या सर्व्हेनुसार कराड दक्षिण या चव्हाण यांच्या मतदारसंघातून भाजप बाजी मारणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube