Download App

मुंबई मेट्रोत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसह विद्यार्थ्यांना 25 टक्के सवलत

Mumbai Metro : मुंबई मेट्रोमधून प्रवास करणाऱ्यांसाठी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. आता मुंबई मेट्रोमधून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. ही सवलत महाराष्ट्र दिन (दि.1 मे) (Maharashtra Day) पासून सुरु होणार आहे. याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांनी केली आहे.

IPL 2023 : पाऊसामुळे सामन्याला उशीर, नाणेफेक जिंकत गुजरात करणार प्रथम गोलंदाजी

ही सवलत मुंबई 1 नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (Mumbai 1 National Common Mobility Card)वापरणाऱ्या प्रवाशांना मिळणार आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमेटेड आणि एमएमआरडीए यांच्याकडून ही महाराष्ट्र दिनाची भेट असणार आहे. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना 45 ट्रीप किंवा 60 ट्रिपसाठी मुंबई-1 पासवर ही सवलत दिली जाणार आहे.

याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक दिव्यांग आणि लहान मुलांच्या गरजा आणि सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून आम्ही मुंबी मेट्रो नेटवर्क तयार केले आहे. त्यामुळे त्यांना या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ मिळणे गरजेचे आहे.

आम्ही यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत केला आहे, तर महिलांनासुद्धा एसटी बसेसमधून 50 टक्के प्रवास सवलत दिली आहे. सामाजिक भावनेतून हे निर्णय आम्ही घेतले आहे. मेट्रो प्रवासातील या सवलतीमुळे देखील अधिक संख्येने लोक यातून प्रवास करतील अशी मला आशा आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

ही सवलत 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, इयत्ता 12 वी पर्यंत शिकणारे विद्यार्थी आणि कायमस्वरुपी दिव्यांगांसाठी आहे. या श्रेणीमधील प्रवाशांना सवलतीसाठी काही कागदपत्रं सादर करावी लागणार आहेत.

त्यामध्ये दिव्यांगांसाठी सरकारी/वैद्यकीय संघटनेचे प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाचा पुरावा आणि विद्यार्थ्यांसाठी पॅन (विद्यार्थी किंवा पालक) त्यासोबत शाळेचे ओळखपत्र अशा कागदपत्रांची आवश्यकता भासणार आहे.

Tags

follow us