शितल गंभीर, तेजस्वी घोसाळकरसह ‘या’ नावांची चर्चा पण मुंबईच्या महापौर पदासाठी रितू तावडेंनी मारली बाजी

Mumbai Municipal Corporation : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेल्या भाजपचा महापौर होणार हे निश्चित झालं होतं

Mumbai Municipal Corporation

Mumbai Municipal Corporation

प्रतिनिधी – प्रशांत गोडसे

Mumbai Municipal Corporation : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेल्या भाजपचा महापौर होणार हे निश्चित झालं होतं. आज महापौर पदासाठी भाजपा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे . मात्र महापौर पदासाठी भाजपमधील अनेक महिला नेत्यांची नावे दरम्यानच्या काळात चर्चेत राहिली. यामध्ये राजश्री शिरवाडकर, रितू तावडे, शितल गंभीर, तेजस्वी घोसाळकर, अलका केरकर, हर्षिता नार्वेकर, आशा मराठे, योगिता कोळी यांचा समावेश आहे. पण आज महापौर पदाच्या नावाची भाजपकडून घोषणा करण्यात अली , त्यामुळे अनेक इच्छुकांच्या नजरा या घोषणेकडे होती.

सकाळी 10 वाजता ही घोषणा होईल असं वाटत होतं मात्र भाजपाच्या नेत्यांमधील मंथनानंतर सुमारे अकरा वाजेच्या नंतर सिद्धेश शिवसेनेचे उपमहापौर आणि भाजपाच्या महापौर नावाची घोषणा करण्यात आली. शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी सुरुवातीला उपमहापौर पदाच्या उमेदवाराची नावाची घोषणा केली आणि उपमहापौर पदाचा कार्यकाळ सव्वा वर्ष असेल असं जाहीर केले. संजय घाडी (Sanjay Ghadi) यांच्या नावाची घोषणा त्यांनी केली.

नंतर मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम (Amit Satam) यांनी महापौर पदाच्या उमेदवार रितू तावडे (Ritu Tawade) यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर महापौर आणि उपमहापौर पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पक्ष कार्यलयातून रवाना झाले.

महापौर पदासाठी सर्वाधिक चर्चेत असणारी नाव 

शीतल गंभीर
– शितल गंभीर या भाजपच्या मुंबई महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत.
– ⁠तसेच शिवाजी पार्क येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शितल गंभीर यांचा उल्लेख करत त्यांचं कौतुक केलं होतं
– ⁠शितल गंभीर या दुसऱ्यांदा मुंबई महापालिका निवडणुकीत जिंकून आल्या आहेत.
– ⁠याआधी त्या 2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर माहीम-दादर येथून प्रभाग क्रमांक 190 मधून निवडून आल्या होत्या.
– ⁠त्यानंतर आता त्या 2024 च्या महापालिका निवडणुकीतही भाजपच्या तिकीटावर जिंकून आल्या आहेत.
-ठाकरे गटाच्या वैशाली पाटणकर यांचा अवघ्या 125 मतांनी पराभव करुन शीतल गंभीर या विजयी झाल्या आहेत.
– ⁠तसेच शीतल गंभीर या शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गंभीर यांच्या कन्या आहेत.

राजश्री शिरवाडकर
– भाजपच्या राजश्री शिरवाडकर यांचंदेखील नाव चर्चेत आहे.
–  ⁠त्या तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत.
– ⁠2017, 2012 आणि 2026 असे सलग तीनवेळा निवडून आले आहेत.
– ⁠ त्या भाजपच्या मुंबई महिला मोर्चाच्या सरचिटणीस आहेत.

रितू तावडे होणार मुंबईच्या महापौर 

18 एप्रिल 1973 रोजी जन्मलेल्या रितु तावडे यांचे शिक्षण एस.वाय.बी.कॉमपर्यंत झाले आहे. त्यांचे पती राजेश तावडे हे उद्योजक आहेत. रितु तावडे स्वतः व्यवसायिक आहे त्या मे. आर. आर. इंटरप्राईजेसच्या प्रोप्रायटर आहेत.

– रितू तावडे या भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आहेत.
– ⁠त्या 2012 मध्ये घाटकोपरमध्ये प्रभाग क्रमांक 121 मधून पहिल्यांदा निवडून आल्या होत्या.
– ⁠त्यानंतर 2027 मध्ये प्रभाग क्रमांक 127 मधून विजय मिळवला होता.
– ⁠यानंतर 2025 च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 132 मधून विजय मिळवला आहे.
-⁠ त्यांनी मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे.

मोठी बातमी! रितू तावडे मुंबईच्या महापौर तर संजय घाडी उपमहापौर होणार

Exit mobile version