मुंबई, ठाणे, पुणेसह ‘या’ महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र; खासदार राऊतांनी दिला विरोधकांना इशारा

Sanjay Raut On Shiv Sena - MNS Alliance : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने

Sanjay Raut On Shiv Sena   MNS Alliance

Sanjay Raut On Shiv Sena MNS Alliance

Sanjay Raut On Shiv Sena – MNS Alliance : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केले आहे. या निवडणुकीसाठी भाजपसह शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार तयारी सुरु आहे. यातच एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेमध्ये युती होणार आहे. याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली आहे.

माध्यमांशी बोलताना उद्या दुपारी 12 वाजता मनसे (MNS) आणि शिवसेना ठाकरे गटाची (Shivsena UBT) युती होणार असून उद्या 12 वाजता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा करणार असं माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले.

माध्यमांशी बोलताना पुढे संजय राऊत म्हणाले की, मुंबई, ठाणे, केडीएमसी, मिरा- भाईंदर, नाशिक आणि पुण्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये युती होणार असं देखील खासदार संजय राऊत म्हणाले. तसेच मुंबई (Mumbai Election) आणि इतर महापालिका निवडणुकीसाठी जागावाटपावर चर्चा पूर्ण झाली असून उद्या याबाबत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

तर दुसरीकडे माध्यमांशी बोलताना खासदार राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत संविधान मारेकऱ्यांच्या गटात अजित पवार आहे अशी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे लोकशाहीचे मारेकरी आहे असं देखील खासदार राऊत यांनी म्हटले आहे.

मुंबईसह राज्यातील इतर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युती होण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा सुरु होती. तर आता दोन्ही पक्षात जागावाटपावर चर्चा पूर्ण झाली असून उद्या 24 डिसेंबर रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे युतीबाबत घोषणा करणार आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांच्या मनसेने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 70 पेक्षा जास्त जागांवर दावा केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे मनसेला किती जागा ऑफर करणार याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

1 एप्रिलपासून आयकर विभागाकडे असणार तुमचे बँक अन् ईमेल अ‍ॅक्सेस? सरकारने दिली महत्वाची माहिती

राज्यातील 29 महानगर पालिकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून राज्यात एकाच वेळी 15 जानेवारी रोजी राज्यातील 29 महानगर पालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. नगरपंचायत आणि नगरपरिषदांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने 123 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. पक्षाला १० जागा मिळाल्याने महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार आणि पक्ष कोणत्या नवीन रणनीतीसह निवडणुकीच्या रिंगणात उतरणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

Exit mobile version