Download App

धीरेंद्र शास्त्रींचा आज मुंबईत दरबार; मनसे-काँग्रेसचा विरोध, अंनिसने केली तक्रार दाखल

Dhirendra Shastri in Mumbai : काही दिवसांपासून राज्यात बागेश्वर धाम आणि धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Shastri in Mumbai) यांच्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. धीरेंद्र शास्त्री आज मुंबईत येत आहेत. मात्र, त्यांच्या येथील कार्यक्रमाला मोठा विरोध होत आहे. त्यातच आता भाजपाच्या आमदाराने शास्त्री यांच्या कार्यक्रमाचे भव्य आयोजन मीरा रोड येथे केल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

धीरेंद्र शास्त्री यांच्या मुंबईतील या कार्यक्रमाला मोठा विरोध होत आहे. अंनिस, मनसेने कार्यक्रमाला विरोध केला आहे. मात्र तरीही त्यांच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी भाजपा आमदारांकडून करण्यात आली आहे.

वाचा : तर धीरेंद्र महाराजांच्या पायावर डोकं ठेवणार, श्याम मानव यांचं धीरेंद्र महाराजांना पुन्हा आव्हान

इतेकच नाही तर काँग्रेसनेही धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्य़क्रमाला विरोध दर्शवला आहे. मनसे नेते संदीप राणे यांनीही हा कार्यक्रम रोखण्याची मागणी केली आहे. या कार्यक्रमाला वाढत असलेला विरोध पाहता वाद होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.

Dhirendra Shastri : तुकाराम महाराजांची बदनामी करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रीने माफी मागावी

दरम्यान, मीरा भाईंदर येथील एसके स्टोन चौकीजवळील सेंट्रल पार्क मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भव्य व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. बागेश्वर धाम सरकारच्या दरबारात सायंकाळी 5 ते 9 या वेळेत दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. भाजप आमदार गीता जैन, जिल्हाध्यक्ष रवी व्यास, कोषाध्यक्ष सुरेश खंडेलवाल यांनी शनिवारी आणि रविवारी दोन दिवस या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगण्यात आले.

Tags

follow us