Download App

Road Accident : ट्रक-बाईकचा भीषण अपघात! दुचाकीवरील तिघांचाही मृत्यू

Road Accident : राज्यातील रस्ते अपघांताची संख्या काही कमी होताना (Road Accident) दिसत नाही. भरधाव वेगातील वाहनांना नियंत्रित करणे अशक्य होऊन अपघात होत आहेत. आताही अशाच एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. बाईक आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला. मुंबईतील (Mumbai News) परळ ब्रिजवर हा भीषण अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मदतकार्यास सुरुवात केली आहे. परेल ब्रिजवर दामोदर हॉलसमोर आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात (Accident) झाला. दुचाकीवर तिघे जण होते. साऊथ बॉन्डने प्रवास करत असताना दुभाजकाला धडक बसून विरुद्ध दिशेने येणाऱ्या डंपरला जोराची धडक बसली.

Road Accident : बीडमध्ये पिकअप-कंटेनरचा भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू

या दोन्ही वाहनांची धडक इतकी जोरदार होती की दुचाकीच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाला. ट्रकच्याही समोरील भागाचे नुकसान झाले. या अपघातानंतर जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथील डॉक्टरांनी मात्र या तिघांना मृत घोषित केले. मृतांमध्ये एक तरुण आणि दोन तरुणींचा समावेश आहे. डंपरचालकाने स्वतः पोलिसांना या अपघाताची माहिती दिली. दुचाकीस्वाराचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर येत आहे.

रस्त्यांवर वाहनांचा वेग भरधाव असतो. त्यामुळे वाहन नियंत्रित करणे सहजासहजी शक्य होत नाही. रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी या उपाययोजनांची गरज आहे. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे.

सिनेसृष्टीवर मोठी शोककळा! विमान अपघातात प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याचा 2 मुलींसह मृत्यू

follow us