Download App

Mumbai-Pune Highway accident : अपघाताची पाहणी करताच मुख्यमंत्री शिंदेनी घेतला मोठा निर्णय…

  • Written By: Last Updated:

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai-Pune highway) खाजगी बस दरीत कोसळून आज पहाटे झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी अपघाताती जखमी लोकांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केली आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आज पहाटे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ खाजगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ४० ते ४५ जण गंभीररीत्या जखमी झाले होते. कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात जाऊन या दुर्घटनेतील जखमी प्रवाशांची विचारपूस केली. पहाटे हे प्रवासी पुण्याहून मुंबईकडे येत असताना अचानक ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्यामुळे ही बस खोल दरीत कोसळली.

राहुल गांधींच्या दौऱ्यामुळे भाजपात मतभेद ? ; बावनकुळेंचा विरोध, मुनगंटीवार म्हणाले, दौऱ्याला..

या दुर्घटनेत १३ जणांना आपले प्राणही गमवावे लागले. सकाळी ही दुर्घटना घडल्याचे कळल्यावर तात्काळ मदतकार्य करणारे हायकर्स आणि आयआरबी रेस्क्यू टीममधील सदस्यांशी चर्चा करून दुर्घटनेची माहिती घेतली. या दुःखद अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत आणि जखमींवर सरकारी खर्चाने उपचार करण्यात येतील. अनेक अपघात प्रामुख्याने पहाटेच्या सुमारास झाले आहे. ज्या ठिकाणी ब्लॅकस्पॉट आहेत, ते आयडेंटीफाय करण्याची सूचना केल्या असल्याची माहितीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. त्यांनी देखील या दुर्घटनेची दखल घेतली आहे. अशा प्रकारच्या घटना पुन्हा पुन्हा होऊ नये, यासाठी काय उपाययोजना करता येतील, यासाठी त्यांनी नॅशनल हायवे, जिल्हाधिकारी, एमएसआरडीसींना सूचना केल्या आहे.

Tags

follow us