Mumbai, Maharashtra Rain Update : भारतीय हवामान विभागाने मुंबईमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. मात्र, पुढील4 तास मुंबईसाठी अत्यंत धोक्याची आहेत. पावसाचा जोर वाढला असून सर्वत्र फक्त आणि फक्त पाणीच बघायला मिळत आहे. प्रशासनाकडूनदेखील नागरिकांना गरज असेल तरचं घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले. मुंबईसह राज्यातील विविध भागातील पावसाचे अपडेट काय याबद्दल माहिती देणारा लेट्सअपचा लाईव्ह ब्लॉग…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धोका पातळी ओलांडलेल्या मिठी नदीचा आढावा घेतला यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना येथील नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्याचा सूचना दिल्या. ठाणे जिल्ह्यात हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला असून, बुधवारपर्यंत रेड अलर्ट असल्याने पुढील दोन दिवस आवश्यक सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे शिंदेंनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये. कमी वेळेत जास्त पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जवळपास तीनशे पेक्षा जास्त लोकांना आपण सुरक्षित स्थळी हलवले आहे. मुंबई महापालिकेचे, प्रशासनाचे सर्वाधिकारी फिल्डवर काम करत असल्याचे शिंदेंनी यावेळी सांगितले.
“राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे. राज्यातील 12 ते 14 लाख एकरवरील शेती बाधित झाली आहे. राज्यातील परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे,” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली.
🕑 1.54pm | 19-8-2025📍Mumbai.
LIVE | Media Interaction#Maharashtra #Mumbai https://t.co/5RWhhqgwWu
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 19, 2025
अतिमुसळधार पावसामुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झाली. परिणामी विविध रेल्वे स्थानकांवर अडकलेल्या प्रवाशांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पाणी, चहा, बिस्कीट व इतर खाद्यपदार्थ पुरवण्यात येत आहेत.
🔹अतिमुसळधार पावसामुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झाली. परिणामी विविध रेल्वे स्थानकांवर अडकलेल्या प्रवाशांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पाणी, चहा, बिस्कीट व इतर खाद्यपदार्थ पुरवण्यात येत आहेत.
___
🔹Mumbai's suburban train services are disrupted due to heavy… pic.twitter.com/HXMPlZHZkv
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 19, 2025
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन#PuneRains#DisasterManagement pic.twitter.com/4OColcTOWB
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) August 19, 2025
गेल्या २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा येथे झाली आहे .तेथे सकाळी ८.३० ते मंगळवारी सकाळी ८.३० पर्यंत २६१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सोमवारी सकाळी ८.३० ते मंगळवारी सकाळी ८.३० पर्यंत झालेली पावसाची नोंद (जिल्हानिहाय)
रत्नागिरी
दापोली – २३० मिमी
मंडणगड – १६८ मिमी
चिपळूण – १५० मिमी
संगमेश्वर – १३४ मिमी
लांजा – २१४.५ मिमी
खेड – १५५ मिमी
गुहागर – १२२ मिमी
सिंधुदुर्ग
वैभववाडी – २३० मिमी
दोडामार्ग – ६० मिमी
मालवण – ५८ मिमी
कुडाळ – ९८ मिमी
कणकवली – १२० मिमी
मुळदे – १०३.४ मिमी
रामेश्वर – ११६.२ मिमी
सावंतवाडी – ९३ मिमी
देवगड – १३१ मिमी
कोल्हापूर
राधानगरी – २२१ मिमी
गगनबावडा – २६१ मिमी
कागल – ६६ मिमी
शाहूवाडी – १६१ मिमी
पन्हाळा – ४७ मिमी
चंदगड – ४६ मिमी
आजरा – ३५ मिमी
गडहिंग्लज – ५७ मिमी
हातकणंगले – ५८ मिमी
शिरोळ – १३ मिमी
सांगली
वाळवा- १६ मिमी
तासगाव – १४ मिमी
शिराळा – ५३ मिमी
आटपाडी – १९ मिमी
कडेगाव – २० मिमी
कवठे महाकाळ- ६ मिमी
पलूस – ७ मिमी
कसबेडिगरज- २३.८ मिमी
मिरज – २६ मिमी
कोकरुड – ५६ मिमी
संख- १८ मिमी
पुणे
लवाळे – ४६.५ मिमी
पाषाण – ४३ मिमी
चिंचवड – ३९.५ मिमी
शिवाजीनगर – ३५.२ मिमी
तळेगाव – ३४ मिमी
हडपसर – २०.५ मिमी
मगरपट्टा – २०.५ मिमी
हवेली – १६.५ मिमी
गिरीवन – १०.५
निमगिरी – ९ मिमी
डुडुळगाव – ८.५ मिमी
राजगुरुनगर – ६.५ मिमी
बारामती – ६.२ मिमी
दौंड – ५.५ मिमी
ढमढेरे – ४ मिमी
दापोडी – ४ मिमी
माळिन – ३ मिमी
घाट परिसरातील २४ तासांत झालेला पाऊस
ताम्हिणी – ३२० मिमी
नवजा- ३०८ मिमी
दाजीपूर – ३०३ मिमी
डोंगरवाडी – २७१ मिमी
भिरा- २६१ मिमी
गगनबावडा – २६० मिमी
माथेरान – २५५ मिमी
गजापूर – २३९ मिमी
सावर्डे – २३३ मिमी
वरंडोली – २२६ मिमी
दवडी – २२५ मिमी
आंबोली – २२२ मिमी
पोफळी- २१५ मामी
शिरगाव – २१० मिमी
भालवडी – २०६ मिमी
मांडुकली – २०४ मिमी
कोयनानगर – २०७ मिमी
आंबवणे – १९६ मिमी
दूधगंगा – १९३ मिमी
घिसर – १९२ मिमी
लोणावळा- १८९ मिमी
कुंभेरी – १८० मिमी
महाबळेश्वर – १७३ मिमी
खंडाळा – १६७ मिमी
रुळ पाण्याखाली गेल्यामुळे मध्य रेल्वेने हार्बर मार्गावरील लोकल सेवा स्थगित केल्या असून, मुख्य मार्गांवरील जलद सेवांनाही फटका बसला आहे.
Central Railway suspends local train services on harbour line due to submergence of tracks; main line fast services also hit: Officials. pic.twitter.com/ftkHErM4SN
— Press Trust of India (@PTI_News) August 19, 2025
मुंबईपाठोपाठ पुण्यातही पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून, धरणक्षेत्रात कोसळणाऱ्या पावसामुळे मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 9659 क्युसेक वाढवून दुपारी 01.00 वा.11878 क्यूसेक करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घ्यावी तसेच नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
राज्य मंत्रीमंडळ बैठकीला सुरूवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील पावसाचा आढाव घेणार आहेत. उपाययोजनांसंदर्भात बैठकीत मोठा निर्णय घेतला जातो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबईसह राज्यभरात सुरू असलेल्या पावसामुळे आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यात नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त परिस्थितीमुळे 9 जणांचा मृत्यू तर, मुंबईत एका व्यक्तीचा भिंत पडून मृत्यू झाला आहे.
सेंट्रल, हार्बर पाठोपाठ वेस्टर्न रेल्वेमार्गावरही वाहतूक ठप्प! वसई ते विरार स्थानकांदरम्यान ट्रॅकवर पाणी साचल्याने लोकल ट्रेनचा खोळंबा झाला आहे.