Municipal Corporation Election Manchar Eknath Shinde Assembly win Shivsena : विधानसभेनंतर पुन्हा एकदा राज्यामध्ये महायुती आणि भाजप शिंदे सेनेची ताकद दाखवणारे निकाल लागले आहेत. आज राज्यातील 288 नगरपरिषद आणि पंचायतींचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये पुणे जिल्हा जो अजित पवार आणि शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र येथे शिंदेंच्या सेनेने बाजी मारल्याचं चित्रप पाहायला मिळत आहे. यामध्ये मंचर नगर परिषदेमध्ये शिंदेंच्या सेनेने विजय मिळवला आहे. मात्र हा विजय अत्यंत अटीतटीचा राहिला आहे. त्यामुळे येथे शिवसेनेला एकनाथ शिंदेंच्या सभेने तारलं आहे. असंच म्हणावं लागेल.
वळसे पाटील आणि आढळरावांचा करिष्मा फेल करणारी शिंदेंची सभा…
मंचर नगरपरिषदेमध्ये महायुतीतील शिवसेना हा पक्ष वेगळा लढला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची युती होती. या ठिकाणी झालेली लढत आणि मिळालेली मतं यावरून असे दिसत आहे ते शिवसेनेला मिळाला विजय हा निसटता विजय विजय आहे. कारण नगराध्यक्ष झालेल्या राजश्री गांजाळे यांच्या पती म्हणजे दत्ता गांजाळे यांचा पराभव झाला आहे. त्यांना केवळ 135 मत मिळाली. तर दुसरीकडे या ठिकाणी भाजपला एकही जागा मिळाली नाही. तसेच अपक्ष उमेदवार प्राची थोरात यांनी देखील कडवी झुंज दिल्याने महायुती आणि इतर सर्वच पक्षांना हे आत्मचिंतन करायला लावणारे ठरले आहे.
Mohol Nagarparishad : राजन पाटलांनी जंग जंग पछाडलं, पण ‘सिद्धी’ने स्वत:ला सिद्ध करुन दाखवलं…
मात्र एवढ्या सगळ्या असला तरी या ठिकाणी अजित पवार यांच्या पक्षाचे रुपेश नेत्यांनी माझी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील तसेच शिवसेनेचे असलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील या दोघांचाही करिष्मा फेल ठरला आहे. मात्र या ठिकाणी शिंदेच्या सेनेला तारणारी ठरली आहे. ती एकनाथ शिंदे यांची सभा मंचरचा गड राखला आहे.
येथील आकडेवारीबद्दल सांगायचं झालं तर येथे नगरपरिषदेमध्ये 17 नगरसेवकांच्या जागांसाठी मतदान पार पडलंय त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस 9, शिवसेना 4, उबाठा 1, शरद पवार गट 1, अपक्ष 2 असे निवडून आले आहेत. तर भाजपला याठिकाणी आपलं खात देखील खोलता आलेलं नाही. तसेच ज्या राष्ट्रवादीचा हा गड मानला जातो. त्या वळसे पाटलांची जादू देखील येथे चाललेली नाही.
