Download App

Radhakrishna Vikhe Patil यांची मोठी घोषणा, राज्यातून ‘एनए टॅक्स’ पूर्णपणे हटवणार

NA Tax Completely free in Maharashtra : रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी क्रेडाई महाराष्ट्र 2023-25 च्या कार्य कारणीच्या पदग्रहण सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी बोलताना त्यांनी ‘एनए टॅक्स’ म्हणजे अकृषी कराविषयी मोठी घोषणा केली. त्यांनी सांगितले की, राज्यामध्ये आता लवकरच एनए टॅक्स पूर्णपणे हटवला जाणार आहे.

त्यामुळे आता जमीन खरेदीच्या वेळी एकदाच लोकांना हा ‘एनए टॅक्स’ म्हणजे अकृषी कर भरावा लागणार आहे. तसेच एकदा हा टॅक्स भरल्यानंतर पुन्हा हा टॅक्स भरण्याची गरज पडणार नाही. या निर्णयामुळे नागरिकांचा मोठा त्रास वाटणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच यामुळे सरकारच्या महसुलावर मात्र परिणाम होणार असल्याचंही ते म्हणाले.

पुढे बोलताना विखेंनी सांगितले की, ‘दरवर्षी एनए करणे ही अत्यंत क्लिष्ट प्रक्रिया असते. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. पण आता एकदा हा टॅक्स भरल्यानंतर पुन्हा हा टॅक्स भरण्याची गरज पडणार नाही. यामुळे प्रामाणिकपणे टॅक्स भरणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. तसेच आता भूमी अभिलेख विभागाकडून मोजणीचे नकाशे देखील 15 दिवसांत आणि ते ही घरपोहच मिळणार आहेत.

नवीन वाळू धोरण लवकरच लागू होणार; वाळूमाफियांचे धाबे दणाणले

या अगोदर महसूल विभागाने वाळूच्या संबंधीत मोठाा निर्णय घेतला होता. राज्यातील प्रत्येक नागरिकाला स्वस्त दरात वाळू मिळण्यासाठी राज्य सरकारनं नवीन वाळू धोरण तयार केलं आहे. त्यामुळे आता वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. राज्य सरकारने या नव्या वाळू धोरणाला नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे आता राज्यात नवीन वाळू धोरण लागू होणार आहे. महाराष्ट्रामध्ये वाळूमाफियांच्या कब्जातून बाहेर काढण्यासाठी हे नवीन वाळू धोरण लागू करण्यात आले आहे. परवा कॅबिनेटच्या बैठकीमध्ये त्याला मान्यता देण्यात आली आहे. आता कॅबिनेटने मान्यता दिल्यानंतर काही दिवसतरी त्याची व्यवस्था करण्यासाठी लागणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.

Tags

follow us