अधिवेशनाचा दुसरा आठवडा वादळी ठरणार? ‘आदित्य’वरील आरोपांनंतर ठाकरे गट आक्रमक

नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा सुरु होतो आहे. आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियन प्रकरणावरुन झालेल्या आरोपांनंतर शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झालाय. त्यामुळं ठाकरे गटाची फौज आज नागपुरात दाखल होणारंय. उद्धव ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर नागपूरमध्ये येणार आहेत. त्यामुळं अधिवेशनाचा दुसरा आठवडा वादळी ठरणार असल्याचं दिसून येतंय. […]

Clipboard   December 26, 2022 7_50 AM

Clipboard December 26, 2022 7_50 AM

नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा सुरु होतो आहे. आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियन प्रकरणावरुन झालेल्या आरोपांनंतर शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झालाय. त्यामुळं ठाकरे गटाची फौज आज नागपुरात दाखल होणारंय. उद्धव ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर नागपूरमध्ये येणार आहेत. त्यामुळं अधिवेशनाचा दुसरा आठवडा वादळी ठरणार असल्याचं दिसून येतंय.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी नवी मुंबईमधील सभेतून शिंदे-फडणवीस सरकारला तसा इशारा देखील दिला होता. ‘एयु’ प्रकरणावरून आदित्य ठाकरेंना घेरल्यानंतर आता ठाकरे गटानेही शिंदे फडणवीस सरकारला जोरदार उत्तर देण्यासाठी रणनीती आखली आहे. संजय राऊत यांनी रविवारी बोलताना नागपुरात बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा दिल्यामुळं आज नागपुरात नक्की काय घडणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

आदित्य ठाकरेंच्या समर्थनार्थ ठाकरे गटाचे दिग्गज नेते नागपूरमध्ये दाखल होणार आहेत. उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर नागपुरात येणार आहेत, गेल्या आठवड्यात दिशा सालियान मृत्यू प्रकरणात शिंदे-फडणवीस सरकारकडून आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला.

Exit mobile version