Nana Patole : आमदार नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. निवडणूक आयोग सध्या सत्ताधाऱ्यांच्या खिशात असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.
नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, देशात टी. एन. शोषण यांनी निवडणूक आयोगाला जी स्वायत्तता आणि शिस्त लावून दिली होती, ती आता संपुष्टात आल्याचे चित्र दिसत आहे. आचारसंहितेचा काळ संपल्यानंतरही निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने निर्णय घेतले आहेत, ते संशयास्पद आहेत. सत्ताधाऱ्यांना फायदा पोहोचवण्यासाठीच या सर्व हालचाली सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.
जिल्हा परिषद निवडणुका आणि आरक्षणाचा मुद्दा राज्यातील 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत, मात्र, विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाड्यातील काही जिल्हा परिषदांना आरक्षणाच्या नावाखाली बाजूला ठेवण्यात आले आहे. यावर प्रश्न उपस्थित करताना पटोले म्हणाले महानगरपालिका (Municipal Corporation) , नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेताना आरक्षणाचा मुद्दा अडथळा ठरला नाही का? मग आताच विदर्भ आणि मराठवाड्याला डावलण्याचे कारण काय? असा प्रश्न देखील नाना पटोले यांनी यावेळी विचारला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 29 महानगरपालिकांमध्ये भाजपचाच विजय होईल’ असा जो दावा केला आहे, त्यावरही पटोले यांनी निशाणा साधला. राज्यात महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायामुळे जनतेमध्ये तीव्र संताप आहे. असे असताना सत्ताधारी इतक्या आत्मविश्वासाने विजयाचा दावा कसा करू शकतात? हा विजय लोकांच्या आशीर्वादाने मिळणार आहे की ईव्हीएममध्ये फेरफार करून? असा बोचरा सवाल त्यांनी केला.
लोकशाहीचा गळा आवळण्याचा प्रयत्न शेवटी, निवडणूक आयोग आणि सत्ताधारी मिळून लोकशाहीचा गळा आवळण्याचे काम करत असल्याची टीका पटोले यांनी केली. टप्प्याटप्प्याने निवडणुका घेऊन सत्ताधाऱ्यांना सोयीस्कर वातावरण निर्माण केले जात असून, हे लोकशाहीसाठी घातक असल्याचे त्यांनी नमूद केले.
हॅपी पटेल: खतरनाक जासूस चित्रपटातील ‘फक्त अपन’ धमाकेदार गाणं रिलीज
तर दुसरीकडे राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी उद्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीत अनेक पक्ष स्वबळावक लढवत असल्याने निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
