Download App

Nana Patole : ‘महाराष्ट्र भूषण’च्या वेळचे मृत्यू हे चेंगराचेंगरीमूळे? पटोलेंचा आरोप, राज्यपालांनी सरकार बरखास्त करावं

  • Written By: Last Updated:

Maharashtra Bhushan Award ceremony : रविवारी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान करण्यात आला. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 13 जणांचा उष्माघाताने (heat stroke) मृत्यू झाला, तर शेकडो जण आजारी पडले. यानंतर या कार्यक्रमाच्या जंगी आयोजनावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या कार्यक्रमात उष्मादाहामुळे झालेल्या मृत्यूवरून सरकार टीकेचं धनी ठरत आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील यावर टीका केली आहे. सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्वरीत राजीनामा दिला पाहिजे. अशी गंभीर टीका त्यांनी केली आहे.

https://twitter.com/NANA_PATOLE/status/1648548864788496384

Dhananjay Mahadik : नैतिकता गमावलेल्यांना कोल्हापूर स्विकारणार नाही, महाडिकांचं सतेज पाटलांवर टिकास्त्र

या सगळ्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी एक ट्विट केलं आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी थेट सरकारवर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी लिहलं आहे की, “महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी झालेले मृत्यू हे चेंगराचेंगरीमूळे? खोके सरकार नक्की काय लपवतंय? या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्वरीत राजीनामा दिला पाहिजे. मी राज्यपाल रमेश बैस यांना हे सरकार बरखास्त करण्याची विनंती करतो.”

दरम्यान, आता या प्रकारणावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी ट्विट करत शिंदे-फडणवीस सरकारला सवाल केला आहे. तर त्यांनी यावेळी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे या प्रकरणाला आणखी वेगळ वळणं मिळत असल्याच दिसत आहे. या ट्विटमध्ये आव्हाड म्हणाले की, ‘खरे सांगा… काल खरच किती जण मृत्युमुखी पडले… मृत्यू उष्मघातानी की चेंगराचेंगरीत… आयोजक सरकार होते… लपवा लपवी करू नका… जबाबदारीचा स्वीकार करा… cctv footage ताब्यात घ्या आणि जनतेला दाखवा… उच्च न्यायालयाच्या न्यायदिशाचा चौकशी आयोग नेमावा…’ अशी मागणी देखील यामध्ये आव्हाड यांनी केली आहे.

Vinod Tawde Committee Report : भाजपचं टेन्शन वाढवणाऱ्या ‘त्या’ अहवालावर तावडेंचं स्पष्टीकरण…

Tags

follow us