Download App

Nana Patole : एकनाथ शिंदे गारुडी तर देवेंद्र फडणवीस फेकण्यात एक्सपर्ट…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गारुडी तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फेकण्यात एक्सपर्ट असल्याचा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे. नाना पटोले यांनी आज मुंबईत असताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

‘हे’ संकट दिल्लीपुरतं मर्यादित नाही; केजरीवालांच्या भेटीनंतर पवारांचा केंद्रावर हल्लाबोल

नाना पटोले म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री गारुडी आहेत, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फेकण्यात एक्सपर्ट आहेत. एकाला नागनाथ अन् दुसऱ्याला सापनाथ म्हटलं तर त्याचे काय परिणाम होतात, ते उत्तर प्रदेशमध्ये पाहिलं आहे. ज्यांनी दुसऱ्याला नागनाथ अन् सापनाथ म्हटलंय त्यांच्याच पत्ता कुठंय ते कळत नसल्याची टीकाही त्यांनी केलीय.

Sirf Ek Banda Kafi Hai Review : मनोज वाजपेयीचा ‘सिर्फ एक बंदा काफी है’ कसा आहे? पाहा रिव्ह्यू…

एकला नागनाथ आणि दुसऱ्याला सापनाथ म्हटल्याने जे परिणाम उत्तर प्रदेशात झाले तेच आता महाराष्ट्रात होणार असल्याचं नाना पटोले म्हणाले आहेत.स्वत:चं स्लोगन स्वत:लाच लावायचं असं तर त्यांचं मत नाही ना? असा उपरोधिक सवाल त्यांनी केला आहे.

‘गद्दारांच्या बाजूला बसून त्यांच्या गाड्या चालवता, काय तु्मच्यावर ही वेळ’; राऊतांचा फडणवीसांना टोला

आम्ही संविधानाचे रक्षक असून जनतेच्या हिताची लढाई लढत आहोत, लोकसभेच्या नवीन इमारतीचा उदघाटन व्हायला निघाले आहे, संसदेची इमारत फक्त विटा, माती आणि लोखंडाची नसून संसदेत संवैधानिक मुल्ये जोपासले गेले पाहिजे, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय.

तसेच एक आदिवासी महिला देशाची महामहिम राष्ट्रपती आहेत. त्यांचा अवमान करणे आणि हे संवैधानिक व्यवस्था संपविण्याचे काम आहे. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, अशी अपेक्षा असणं स्वाभाविक असून त्या गोष्टीचा आम्ही समर्थन करत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Tags

follow us