‘गद्दारांच्या बाजूला बसून त्यांच्या गाड्या चालवता, काय तु्मच्यावर ही वेळ’; राऊतांचा फडणवीसांना टोला

‘गद्दारांच्या बाजूला बसून त्यांच्या गाड्या चालवता, काय तु्मच्यावर ही वेळ’; राऊतांचा फडणवीसांना टोला

Sanjay Raut Criticized Devendra Fadnavis : संसद भवनाच्या उद्घाटनावरून जोरदार वाद पेटला असून हा वाद वाढत चालला आहे. दुसरीकडे भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली म्हणून ठाकरे गटावर प्रहार करत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याच मुद्द्यावर ठाकरे गटाला डिवचले होते. त्याला आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्युत्तर दिले.

राऊत म्हणाले, फडणवीसांना काहीही बोलू द्या. बाळासाहेबांनी कधी कोणत्या व्यक्तीला विरोध केला नाही. भुमिकांना केला असेल. फडणवीस यांच्याकडून बाळासाहेब शिकण्याइतकी वाईट वेळ आमच्यावर आलेली नाही. त्यांनी त्यांच्या पक्षाविषयी बोलावं. बाळासाहेबांनी कधी बेईमानांना मांडीवर घेतलं नव्हतं. गद्दारांना लाथा मारून हाकलून द्या असं सांगितलं होतं. फडणवीस मात्र गद्दारांच्या गाड्या चालवत होते. त्यांच्या बाजूला बसून. काय त्यांच्यावर वेळ आली आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.

Prakash Aambedkar : नाना पटोले इंग्रजी चित्रपटाप्रमाणे हॉट अ‍ॅन्ड ब्लो; हवा कभी गरम, हवा कभी नरम

 

सापनाथ, नागनाथ एकत्र आले तरीही मोदींचा पराभव करू शकणार नाहीत असे फडणवीस म्हणाले होते. त्यावर राऊत म्हणाले, सापनाथ आणि नागनाथाची इथे लोक पूजा करतात. तुम्ही हिंदू आहात ना, आपल्या देशात सापनाथ आणि नागनाथांची पूजा केली जाते. तुम्हाला त्यात त्रास होण्याचं काय कारण, असा उलट सवाल राऊत यांनी केला.

आम्ही देशभक्त

हुकूमशहा नेहमी ठाम असतो. लोकशाही मार्गाने विचारला प्रश्नाला हुकूमशाही उत्तर देत नाही तर लोकशाही मार्गाने उचललेला आवाज ते चिरडून टाकतात. विरोधी पक्षाची मागणी नेमकी काय ? उद्धव ठाकरे यांनी काल चांगली भूमिका मांडली आम्ही विरोधी पक्ष नसून देशभक्त आहोत आम्ही लोकशाहीवादी आहोत, असे राऊत म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube