Prakash Aambedkar : नाना पटोले इंग्रजी चित्रपटाप्रमाणे हॉट अ‍ॅन्ड ब्लो; हवा कभी गरम, हवा कभी नरम

Prakash Aambedkar : नाना पटोले इंग्रजी चित्रपटाप्रमाणे हॉट अ‍ॅन्ड ब्लो; हवा कभी गरम, हवा कभी नरम

Prakash Aambedkar On Nana Patole : वंचित पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर टीका केली आहे. आंबेडकर म्हणाले की, नाना पटोले इंग्रजी पिक्चर प्रमाणे हॉट अँड ब्लो आहेत. हवा कभी गरम हवा कभी नरम अशा रीतीने ते वक्तव्य करतात. अशी टीका आंबेडकरांनी पटोलेंवर केली आहे.

‘नेहरुंच्या परंपरेवर भाजप चालणार’, अमित शाहांनी सांगितला ‘सेंगोल’चा किस्सा

त्याचबरोबर ते पुढे असं गेखील म्हणाले की, ‘नाना पटोले यांनी नागपूरमध्ये असताना वक्तव्य केलं की, काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे लढणार. महाविकास आघाडीमध्ये बसले की, आम्ही एकत्र लढणार, त्याच्यामुळे हा गुमराह करण्याचा जो भाग आहे. त्याचं टार्गेट कोण आहे? हे मला वाटतं की शिवसेनेने उद्धव ठाकरे यांनी लक्षात घ्यावं की, टारगेट कोण आहे? त्या स्टेटमेंटच आणि उद्देशच. असा सल्ला देखील प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

आता नाना पटोलेंचेही झळकले ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून बॅनर, राजकीय वर्तुळात चर्चा

दरम्यान महाविकास आघाडीचे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य जागा वाटप ठरलं आहे का? असा सवाल सध्या विचारला जात आहे. मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटप मुद्द्यावरुन प्रचंड चर्चा सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांची ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी बैठक झाली. यात आगामी लोकसभेसाठी 16-16-16 चा फॉर्म्युला ठरवण्यात आल्याचे सांगण्यात येत होते.

मात्र, शिवसेना नेते (UBT) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना 19 जागांवर लोकसभा निवडणूक लढवेल, असा दावा केला. संजय राऊत यांच्या या दाव्यावर काँग्रेस आणि वारंवार सांगत आहेत. त्यामुळे आगामी काळात जागा वाटपावरून मविआ बिघाडी निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यावरून सध्या महा विकास आघाडीमध्ये तूतू मैंमैं सुरू आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube