आता नाना पटोलेंचेही झळकले ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून बॅनर, राजकीय वर्तुळात चर्चा
Nana Patle : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक भावी मुख्यमंत्री झाले आहेत. आता यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचीही भर पडली आहे. कल्याणमध्ये नाना पटोलेंच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. कल्याणमधील या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले होते. अशात आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले एका कार्यक्रमासाठी डोंबिवलीत येणार आहेत. त्यावेळी कल्याणमध्ये पटोलेंच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर त्यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. कल्याणमधील बॅनरवरुन आता एकच चर्चा सुरु आहे.
आकाश मधवालचा पंच, लखनऊला हरवून मुंबईने गाठली दुसरी क्वालिफायर
लोकसभा निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली आहे. पण महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये पाहिजे तसा समन्वय दिसत नाही. जागावाटपावरुन महाविकास आघाडीत परस्परविरोधी वक्तव्य केली जात आहेत. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) महाविकास आघाडीत एकत्र निवडणुका लढवणार असले तरी जागावाटपाचा फॉर्मुला अजून ठरलेला नाही.
सापनाथ-नागनाथ एकत्र आले; ठाकरे-केजरीवाल भेटीवर फडणवीसांचा टोला
महाविकास आघाडीत सामील असलेले तिन्ही पक्ष जागावाटपाचा आपापला फॉर्मुला मांडत आहेत. महाविकास आघाडीमध्ये चर्चा बैठकांचा सपाटा सुरु असताना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलेले बॅनर लावण्यात येत आहेत.