सापनाथ-नागनाथ एकत्र आले; ठाकरे-केजरीवाल भेटीवर फडणवीसांचा टोला

सापनाथ-नागनाथ एकत्र आले; ठाकरे-केजरीवाल भेटीवर फडणवीसांचा टोला

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांनी मुंबईत येऊन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात मतदान करण्याची घोषणा केली. आता उद्या अरविंद केजरीवाल शरद पवरांना भेटणार आहेत. भाजपविरोधात विरोधक एकत्र येत आहेत. याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की सापनाथ-नागनाथ एकत्र येत आहेत.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचा प्रयोग 2019 मध्ये केला होता. वेगवेगळ्या राज्यात देखील केला होता पण यात त्यांना यश आले नव्हते. यापुढेही ते यशस्वी होणार नाहीत पण मला एका गोष्टीचा आनंद आहे की देशात एनडीए आणि राज्यात भाजप-शिवसेना युतीची दहशत किती आहे. आता अरविंद केजरीवाल यांना उद्धव ठाकरेंच्या घरच्या चकरा माराव्या लागत आहेत. आणि ठाकरेंना अरविंद केजरीवाल यांच्या घरच्या चकरा माराव्या लागत आहेत. याचा अर्थ आम्हाला मिळणाऱ्या जनसमर्थनामुळे हे घाबरले आहेत. त्यामुळे एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. त्यामुळे हे लोकं कितीही एकत्र आले तरीही याचा परिणाम होणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

‘दादा’ हात जोडतो पाणी सोडा, कुकडीच्या पाण्यासाठी राम शिंदेंचे चंद्रकांत पाटलांना साकडे

देवेंद्र फडणवीस म्हणाले की हे लोक लोकशाही वाचवण्याच्या गोष्टी करत आहेत परंतु हे लोक मुळात लोकशाही मानणारे नाहीत. लोकशाहीच्या गोष्टी करुन हे लोक स्वत:चा नाकर्तेपणा लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकशाही वाचवणं हा त्यांचा अजेंडा नसून केवळ नरेंद्र मोदींना पराभूत करणं हा त्यांचा एकमेव अजेंडा आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube