Download App

IT Raid : ठाकरेंच्या मेहुण्याला कर्ज दिल्याचा आरोप असणाऱ्या चतुर्वेदीवर आयकर छापा

Nandkishor Chaturwedi IT Raid :  आयकर विभागाने काल मोठी कारवाई केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीला कर्ज दिल्याचा आरोप असणारे नंदरकिशोर चतुर्वेदी यांच्याविरोधात आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. तसेच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत देखील याबाबतचा आरोप केला आहे.

नंदकिशोर चतुर्वेदी यांचे पुष्पक बुलियन केसमध्ये नाव समोर आले आहे. नंदकिशोर हे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून बेपत्ता आहे. त्यांचा शोध ईडी आणि आयकर विभागाकडून सुरु आहे. ईडी त्यांच्या मागावर होतीच पण आता आयकर विभागानेदेखील कारवाई केली आहे. चतुर्वेदी सध्या फरार आहेत.

Shilpa Shetty: ‘अक्षय कुमारने माझा वापर..’, शिल्पा शेट्टीने केला होता गंभीर आरोप

नंदकिशोर चतुर्वेदी यांच्याशी संबंधित शेल कंपन्यांवर आयकर विभागाने हे छापे टाकले आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता व उत्तर प्रदेश येथे आयकर विभागाचे छापे टाकले आहे.  नंदकिशोर चतुर्वेदी हे उत्तर प्रदेशच्या मथुरा येथील रहिवासी आहे. ते पेशाने सीए असून हमसफर डिलर्स नावाची बनावट कंपनी चालवण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या कंपनीच्या नावाने उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना कर्ज दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दहावी, बारावी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी; वनरक्षक पदाच्या 2138 जागांसाठी भरती

चतुर्वेदी हे 2017 पासून ईडीच्या रडावर आहेत. तसेच त्यांनी बनावट कंपन्या बनवल्याचा आरोप आहे. त्यांनी कोलकात्यात कार्यालय केल्याचा देखील आरोप आहे. वर्षभरापूर्वी चतुर्वेदींचा शोध सुरु असताना श्रीधर पाटणकर यांची ठाण्यातील काही संपत्ती जप्त करण्यात आली होती.

Tags

follow us