Mahadevi Hattini : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात चर्चेत असणारी नांदणी मठातील (Nandani Math) महादेवी हत्तीण (Mahadevi Hattini) अखेर गुजरातच्या (Gujarat) वनताराकडे (Vantara) जाण्यासाठी रवाना झाली आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर महादेवी हत्तीण गुजरातला रवाना झाली आहे. मात्र त्यापूर्वी महादेवी हत्तीणीला निरोप देताना नांदणीकरांचा अश्रूच्या बांध फूटला. महादेवी हत्तीणीला निरोप देताना लहानांपासून मोठ्यापार्यंत ग्रामस्थ भावूक झाले होते.
हत्तीणीला निरोप देण्यासाठी ग्रामस्थांनी गावातून मिरवणूक काढली होती. तर दुसरीकडे या मिरवणुकीत काही तरुणांनी गोंधळ घातल्याने पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.
मागील 33 वर्षांपासून महादेवी हत्तीणीचा मठात सांभाळ
सर्वोच्च न्यायालयाने नांदणी गावतील नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीबाबतची याचिका फेटाळली होती. त्यामुळे महादेवी हत्तीण गुजरातच्या वनताराकडे जाणार आहे. न्यायालयाच्या या निर्णायामुळे नांदणी ग्रामस्थ नाराज झाले आहे. माहितीनुसार, मागील 33 वर्षांपासून महादेवी हत्तीणीचा सांभाळ नांदणी मठात करण्यात येत होता मात्र आता महादेवी हत्तीणीला गुजरातच्या वनतारा अभय़ारण्यात नेण्यात येणार असल्याने ग्रामस्थ नाराज झाले आहे.
‘छातीत दुखतंय’ म्हणत मीटिंगमधून बाहेर गेला, अन् इंजिनिअर तरुणाने 7व्या मजल्यावरून मारली उडी
प्रकरण काय?
मिरवणुकीसाठी वन विभागाकडून परवानगी न घेता महादेवी हत्तीणीचा वापर करण्यात आला असल्याचा आरोप ‘पेटा’ ने केला होता. हे प्रकरण न्यायालयात पोहचल्यानंतर चैकशीसाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीने हत्तीणीची पाहणी करुन अहवाल सादर केला होता. या अहवालात प्राण्यांच्या हक्काला प्राधान्य द्यावे लागेल असे निरीक्षण नोंदवल होतं.