Download App

नांदेडचं मृत्यू तांडव प्रकरण! खाजगी डॉक्टर-नर्सची मदत घेण्यासाठी प्रयत्न; अशोक चव्हाणांनी सांगितलं

Ashok Chavan Speak on Nanded Death : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात एकाच दिवसात २४ जणांना जीव गमवावा लागला. रुग्णालयात अपुऱ्या सोयीसुविधा, डॉक्टरची कमतरता, नर्सेच्या बदल्या झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मृत्यूंचा आकडा वाढतच चालला असून आत्तापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

नांदेडच्या रुग्णालयातील मृत्यूंची हायकोर्टाकडून दखल, सु-मोटो याची दाखल, उद्या होणार सुनावणी

या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पुढे सरसावल्याचं दिसून आले आहेत. व्यक्तीगत पातळीवर खाजगी डॉक्टरांसह नर्स यांच्याशी बोलणं करत आहेत. यासोबच काँग्रेसच्यवतीने लाखो रुपयांचे औषधेही रुग्णालयात दिल्याची माहिती समोर आली आहे.

डीनला शौचालय साफ करायला लावणं भोवलं : खासदार हेमंत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

अशोक चव्हाण म्हणाले, गेल्या तीन दिवसांपासून शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाची परिस्थिती फार चिंताजनक आहे. यात रोजच रूग्णांचा मृत्यू होण्याचा अकडा समोर येत आहे. डॉक्टर, नर्स व औषधांची कमतरता लक्षात आली आहे.

निवडणुकांचं बिगुल वाजलं! राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी होणार मतदान…

वैद्यकीय महाविद्यालयातील परिस्थिती सुधारण्यासाठी काही खाजगी डॉक्टर व नर्स यांच्याशी व्यक्तिगतरीत्या बोलणी सुरू असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं, युवक काँग्रेसच्या एक लाख व आज साडेचार लाख रुपये किंमतीची औषधी रुग्णालयाला देण्यात आली आहे. या पुढेही औषधी देण्याचा ओघ सुरूच राहिल असंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.

Weather Update : पुढील 24 तास महत्वाचे; ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अलर्ट

नांदेडच्या दुर्देवी घटनेनंतर छत्रपती संभाजीनगरमधील घाटी शासकीय रुग्णालयात दोन अर्भकांसह 10 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यभरातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर असल्याची स्थिती आहे. याआधी ऑगस्ट महिन्यात ठाण्यातील शासकीय छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्रीत 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत नांदेडच्या रूग्णालयातील मृत्यूची चौकशी करून सर्व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले की, प्राथमिक तपासात औषध, डॉक्टर किंवा इतर कर्मचाऱ्यांची कमतरता नसल्याचे समोर आले, तरीही ही दुर्घटना घडली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पुढील कारवाई करू, असं ते म्हणाले.

कोणत्या जातीचे किती लोक? हे देशाला एकदा कळू द्या; जातनिहाय जनगणनेवरून पवारांचे थेट भाष्य

दरम्यान, नांदेड मृत्यू प्रकरणाची राज्य सरकारकडून दखल घेण्यात आली असून मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच राज्य आरोग्य यंत्रणेकडून नांदेड मृत्यू प्रकरणाचा आढावा घेण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काळात रुग्णालयात चौकशीनंतर दोषींवर कारवाई होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us