Download App

नंदूरबार तापलं! मूक मोर्चाला हिंसक वळण; दगडफेक, गाड्यांची तोडफोड, पोलिसांचा लाठीचार्ज

नंदूरबार शहरात आदिवासी युवकाच्या खुनाच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मूक मोर्चाला हिंसक वळण लागले.

  • Written By: Last Updated:

Nandurabar Adivasi March Turns Violent : नंदूरबार शहरात आदिवासी युवकाच्या खुनाच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मूक मोर्चाला हिंसक वळण लागले. पूर्ण मोर्चा शांततेत पार पडल्यानंतर काही उपद्रव्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली. बंदोबस्ताला असलेल्या पोलीस आणि उपद्रव्यांमध्ये दगडफेक झाल्याची घटना घडली.

आंदोलनाला हिंसक वळण

पोलिसांनी जमावाला (Nandurabar) कंट्रोलमध्ये आणण्यासाठी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या. घटनेत (Crime News) एक पोलीस अधिकारी एक पोलीस कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते मालती वाळवी (Adivasi March Turns Violent) देखील जखमी झाल्याची माहिती समोर आली. जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पोलीस परिस्थिती नियंत्रण आणण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत.

नेमकी काय घडली?

नंदूरबार शहरात काही दिवसांपूर्वी दोन तरुणांमध्ये झालेल्या भांडणात गंभीर जखमी झालेला जय वळवी (Jai Walvi) या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ आदिवासी संघटनांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला होता. मोर्चा शांततेत पार पडत असतानाच काही उपद्रवींमुळे परिस्थिती बिघडली आणि आंदोलनाला हिंसक वळण लागले.

उभ्या गाड्यांची तोडफोड

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उभ्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली, तर पोलिसांवर दगडफेक झाल्याचेही समजते. अचानक निर्माण झालेल्या या गोंधळामुळे मोर्चात सहभागी नागरिकांमध्ये सैरावैरा धावपळ झाली. पोलिसांनी तत्काळ लाठीचार्ज करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर जमाव पांगवण्यासाठी अश्रुधुराचे नळकांडेही फोडण्यात आले. या कारवाईत एक पोलीस अधिकारी, एक पोलीस कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी यांना दुखापत झाली असून, जखमींची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

घटनेचा मागोवा

जय वळवीवर सूर्यकांत मराठे या आरोपीने चाकूहल्ला केला होता. या हल्ल्यानंतर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे आदिवासी समाजामध्ये तीव्र रोष पसरला. जय वळवीला न्याय मिळावा यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चादरम्यान आंदोलनकर्त्यांनी आरोपींना कठोर शिक्षा, अगदी फाशीचीही मागणी केली. सध्या नंदूरबार शहरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

follow us