Vishwas Nangare Patil On RSS : नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात चर्चेत आहे. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमात हजेरी लावल्याने काँग्रेससह मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पोलीस सेवेचा राजीनामा देऊन संघात सहभागी व्हा अशी टीका राज ठाकरे यांनी विश्वास नांगरे पाटील यांच्यावर केली आहे. तर दुसरीकडे आता या प्रकरणात नांगरे पाटील यांच्याकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आपण संविधानाशी कटिबद्ध असून सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून मार्गदर्शन करणे हे आपल्या कर्त्व्याचाच भाग असल्याची प्रतिक्रिया नांगरे पाटील यांनी दिली आहे.
माध्यमांशी बोलताना नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) म्हणाले की, सगळ्यांचा आम्हाला आदर आणि सन्मान आहे. मी एक भारतीय पोलीस सेवेतला अधिकारी आहे. माझी कटिबद्धता संविधानाशी आणि संविधानिक मूल्यांशी आहे. रुल ऑफ लॉ अबाधित ठेवणे हे माझं कर्तव्य आहे. नागपूर डॉ. बाबासाहेब आंबडेकरांची दिक्षाभूमी देखील आहे. त्यांच्या तत्वांशी आम्ही पाईक होतो आणि राहणार आहोत. कायद्याच अंमल ठेवण्याबरोबरच लोकांचं प्रबोधन करणे हे देखील पोलिसांच काम आहे. त्यामुळे सामाजिक , सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये जाणे आणि तेथील युवकांना, वृद्धांना आणि स्त्रियांना मार्गदर्शन करणे हे आमचे कर्तव्य आहे असं विश्वास नांगरे पाटील म्हणाले.
RSS चं कौतुक केल्यानं काँग्रेससह राज ठाकरेंकडून टीकेची झोड, अखेर नांगरे पाटलांचं स्पष्टीकरण pic.twitter.com/rdfAC3mWS6
— Sumit Bhujbal (@SumitBhujb19648) June 29, 2026
तसेच चार दिवसांपासून या विषयावर खूप चर्चा होत आहे. त्यामुळे मी सांगू इच्छितो की, हा कार्यक्रम 19 एप्रिल रोजी सानपाडा येथे झाला होता. याचं निमंत्रण देण्यासाठी सानपाडा येथील सकल हिंदू समाजाचे प्रतिनिधी माझ्याकडे आले होते. डॉक्टर, चार्टर्ड अकाऊंट असलेले लोकं माझ्याकडे आले होते. ते निमंत्रण आजही माझ्याकडे आहे. या कार्यक्रमात महीला, मुलं, जेष्ठ नागरिक अशा सर्वांना बोलावण्यात आलं होतं असेही माध्यमांशी बोलताना विश्वास नांगरे पाटील म्हणाले.
अत्याचाराच्या घटनांना केवळ सरकार जबाबदार नाही; भाजपच्या महिला आमदाराचं अजब विधान…
रमजान, बौद्ध आणि ख्रिश्चन समाजाच्या कार्यक्रमांनाही नियमित उपस्थित राहिलो
तर पुढे बोलताना नागरे पाटील म्हणाले की, मी रमजान, बैद्ध आणि ख्रिश्चन समाजाच्या कार्यक्रमांनाही नियमित उपस्थित राहिलो. हे नित्याचं आहे. मी जात असतो. हा कार्यक्रम कार्यालयीन वेळेनंतर रात्री साडेआठ वाजता झाला होता. त्या कार्यक्रमात आपण उपनिषदातील एक मंत्र सांगितला, प्रेम आणि सेवा ही आपली संस्कृती असल्याचे मांडले. ज्ञानेश्वरीवरीतील पसायदानाबाबत सविस्तर भाष्य केले. तसेच ड्रग्सविरोधी जनजागृतीवरही बोललो. माझी सिलेक्टिव्ह क्लीप व्हायरल झाली. आपण कोणत्याही नियमाचा भंग केलेला नाही आणि जे काही बोललो ते कायद्याच्या चौकटीत राहूनच बोललो असं देखील माध्यमांशी बोलताना विश्वास नांगरे पाटील म्हणाले.
