Download App

Video : नरहरी झिरवळांचे टोकाचं पाऊलं; थेट मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी

मुख्यमंत्र्यांना आमचे ऐकावं लागेल ते ऐकत नसतील तर आमच्याकडं प्लॅन बी तयार आहे, असं काही तासांपूर्वी नरहरी झिरवळ यांनी म्हटलं होतं.

  • Written By: Last Updated:

Narahari Jhirwal Jumped on Net In Ministry : राज्याच्या राजकारणात धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. सत्ताधारी पक्षात असलेले आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Jhirwal) यांच्यासह दोन आमदारांनी मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर उड्या मारल्या. उड्या मारण्यापूर्वी झिरवळ यांच्यासह काही आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. ही भेट निष्फळ ठरल्यानंतर झिरवळ यांच्यासह दोन आमदारांनी जाळीवर उड्या मारल्या आहेत.

भरती करण्याची मागणी

मुख्यमंत्र्यांना आमचे ऐकावं लागेल ते ऐकत नसतील तर आमच्याकडं प्लॅन बी तयार आहे, असं काही तासांपूर्वी नरहरी झिरवळ यांनी म्हटलं होतं. एसटीच्या आरक्षणास धक्का लागू नये, ही मुळ मागणी आमदारांची आहे. पेसा कायद्यांतर्गत भरती करण्याची मागणी या आमदारांची आहे. या भयंकर प्रकाराने मंत्रालय हादरलं आहे.

इंदापूर तालुक्याचा राजकीय वनवास संपला; अखेर हर्षवर्धन पाटलांचा भाजपला राम-राम, तुतारी फुंकली

गेल्या काही दिवसांपासून आदिवासी समाजासाठी नरहरी झिरवळ आंदोलन करत आहेत. त्यांनी आदिवासी समाजाच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन वेळा भेट घेतली होती. मुख्यमंत्री आमचे ऐकत नसतील तर आमच्याकडे प्लॅन बी आहे, असं नरहरी झिरवळ यांनी म्हटलं होतं. त्या प्लॅन बी नुसार नरहरी झिरवळ आणि इतर दोन आमदारांनी संरक्षक जाळीवर उडी मारली. त्यानंतर नरहरी झिरवळ यांची प्रकृती बिघडली. त्यांचा रक्तदाब वाढला आहे. त्यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांची टीम मंत्रालयात पोहचली आहे.

आमदार, खासदारांच्या ठिय्या

आदिवासी समाजातील आमदार आणि खासदारांनी मंत्रालयात ठिय्या मांडला आहे. त्यात किरण लहामटे, हेमंत सावरा, काशीराम कोतकर यांचा समावेश आहे. आमदार आणि खासदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मंत्रालयात आले होते. परंतु, मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही, असं करिण लहामटे यांनी म्हटलं आहे.

follow us

संबंधित बातम्या