इंदापूर तालुक्याचा राजकीय वनवास संपला; अखेर हर्षवर्धन पाटलांचा भाजपला राम-राम, तुतारी फुंकली

इंदापूर तालुक्याचा राजकीय वनवास संपला; अखेर हर्षवर्धन पाटलांचा भाजपला राम-राम, तुतारी फुंकली

Harshvardhan Patil’s Decision to Join NCP SP : भाजपला विधानसभेच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे. इंदापूर तालुक्यातील भाजपचे मोठे नेते हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपला राम-राम करत तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी शरद पवार या पक्षात प्रवेश जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आज इंदापूर येथे जाहीर कार्यक्रमात आपण या पक्षात जायचं की नाही अशी चर्चा कार्यकर्त्यांशी करून त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत या निर्णयाची घोषणा केली.

शरद पवारांनी मराठा आरक्षणाबाबत केलं मोठं वक्तव्य, ही मागणी करत पाठिंबा केला जाहीर

काल शरद पवार यांची आणि माझी सिल्वर ओकला बैठक झाली. त्यामध्ये शरद पवार मला म्हणाले इंदापूरमधील अनेक लोकांचं मत आहे की तुम्ही निवडणूक लढवा. त्यामुळे तुमच्या लोकांशी चर्चा करुन तुम्ही निर्णय घ्या, त्या पुढची जबाबदारी माझी असं पवार आपल्याला म्हणल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितलं. तसंच, शरद पवार यांच्याशी चर्चेअगोदर मी देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केली आहे. त्या चर्चेत फडणवीस यांनी आपली अडचण समजून घ्या असं म्हटल्याचंही पाटील यांनी यावेळी सांगितलं आहे.

पत्रकारांच्या प्रश्नांवर पाटलांचे नो कमेन्ट्स

देवेंद्र फडणवीसांबरोबर झालेल्या चर्चेत त्यांनी तुम्हाला कोणता प्रस्ताव दिला होता असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर मात्र हर्षवर्धन पाटील यांनी उत्तर देणे टाळले. याबाबतीत चर्चा झाली आहे. त्यावर आता काही बोलता येणार नाही असं हर्षवर्धन पाटील म्हणाले. ज्या पवार कुटुंबाविरोधात राजकारण केलं. आता त्यांच्याच एक गटात तुम्ही प्रवेश करत आहात असं विचारलं असता पाटील म्हणाले, राजकारणात कुणी कुणाचा शत्रू नसतो. आमचे व्यक्तिगत संबंध आहेत. ते टिकवावे लागतात. ही राज्याची संस्कृती. ती जपण्याचं काम करतोय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube