…अन् दिवट्या आमदार पोलीस स्टेशनला, पवारांनी सुनील टिंगरे यांना धुतले

  • Written By: Published:
…अन् दिवट्या आमदार पोलीस स्टेशनला, पवारांनी सुनील टिंगरे यांना धुतले

Sharad Pawar on Sunil Tingre : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली. अनेक नेत्यांनी राज्याचा दौरा सुरू केलाय. शरद पवार गटानेही राज्यात शिवस्वराज्य यात्रा सुरू केली. स्वत: शरद पवारही (Sharad Pawar) अनेक ठिकाणी सभा घेत आहे. दरम्यान, आज पुण्यातील एका सभेत बोलतांना शरद पवारांनी पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणामुळे चर्चेत आलेले अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांच्यावर जोरदार टीका केली. दिवट्या आमदार म्हणत त्यांनी टिंगरेंचा चांगलाच समाचार घेतला.

राजेश पाटलांना निवडून द्या, पाच वर्षात दुप्पट निधी देईल; अजितदादांचे मतदारांना आवाहन 

तुझा बंदोबस्त करणार…
शरद पवार यांची आज पुण्यात सभा झाली. या माजी आमदार बापू पठारे यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी बोलतांना पवारांनी आमदार डिंगरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले की, मी येतांना बघितलं, रस्त्याच्या कडेला मोठंमोठे बोर्ड होते. आमचा दमदार आमदार असं त्यावर लिहिलं होतं. त्या आमदाराचं नाव टिंगरे. अरे बाबा, तु कोणाच्या तिकीटावर निवडणूक आला. त्यावेळी तुझ्या पक्षाचा नेता कोण होता?  हा पक्ष कोणी काढला? राष्ट्रवादीची स्थापना कुणी केली? हे सर्व हिंदुस्थानला माहिती आहे.. तुला संधी दिली, पण तू सोडून गेला. आता तुझा काय बंदोबस्त करायचा ते हे लोक करतील, असा इशारा पवारांनी दिलं.

…अन् दिवट्या आमदार पोलीस स्टेशनला…
पवार म्हणाले, तू पक्ष सोडून गेला, पण निदान चुकीच्या गोष्टीला तरी पाठिंबा देऊ नको. स्कुटरवर दोन तरूण मुलं-मुली जात असतांना त्यांना चिरडल जातं, जागच्या जागेवर त्यांची हत्या होते, अशावेळी हा दिवट्या आमदार त्यांना मदत करण्याऐवजी पोलिस स्टेशनला, असा हल्लाबोल पवारांनी केला.

पुढं पवार म्हणाले, तू याच्यासाठी मत मागितली होती का? मत मागितली ती राष्ट्रवादीच्या नावावर, शरद पवारांच्या नावावर मतं मागितली. लोकांनी श्रद्धेनं मतदान केल. त्याचं उत्तरादयित्वत तुम्ही असं करता का? ज्या लोकांना आणि ज्या कुटुंबातील लोकांना सत्तेचा माज चढला. जे गोरगरीबांना उद्धस्त करतात, अशा लोकांच्या पाठीशी तुम्ही उभे राहता, अरे, शरम वाटली पाहिजे. हा कसला दमदार आमदार, असा घणाघात पवारांनी केला.

जनता हिशोब करणार…
पवार म्हणाले, माझ्या वाचनात आलं पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी जाहीरपणे सांगितलं की, आढळराव पाटील यांना मदत करण्यसाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ज्यांनी त्यांच्यावर कारवाई होईल. आमदार टिंगरे यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग आहे, असं आयुक्तांनी सांगितलं होतं. तुम्ही पक्ष सोडला, लोकांना दिलेल्या शब्द मोडला अन् ज्या पक्षाने तुम्हाला मोठं केलं, तोच पक्ष पक्ष घेऊन पळाले. आता ही जनता तुमचा हिशोब करणार, असा इशारा पवारांनी दिला.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube