Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई हायकोर्टाने त्यांचे सिंधुदुर्ग येथील बंगल्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. याबाबतची एक पोस्ट ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पोस्ट केली आहे.
केंद्रीय मंत्री व भाजपा खासदार – नारायण राणे यांच्या मालवण -चिवला बीचवरील CRZ-2 चे उल्लंघन करून बांधलेल्या “नीलरत्न बंगल्याप्रकरणात” मुंबई हायकोर्टाचे सिंधुदुर्ग जिल्हा कलेक्टर यांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
केंद्रीय मंत्री व भाजपा खासदार – नारायण राणे यांच्या मालवण -चिवला बीचवरील CRZ-2 चे उल्लंघन करून बांधलेल्या “नीलरत्न बंगल्याप्रकरणात” मुंबई हायकोर्टाचे सिंधुदुर्ग जिल्हा कलेक्टर यांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी समुद्राजवळच्या जमिनीवर, वन विभागाच्या जमिनीवर, अनेक अनधिकृत बांधकामे बंगले, हॉटेल्सची उभारणी केली आहे. त्यापैकीच हा एक “नीलरत्न बंगला” आहे. या बंगल्याचे सुद्धा “CRZ-2 कायद्याचे” उल्लंघन करून बांधकाम केलेले आहे. ह्या बांधलेल्या अनधिकृत “नीलरत्न बंगल्याची” माहिती अधिकार कार्यकर्ता प्रदीप भालेराव यांनी मुंबई हायकोर्टात रिट पितीशन (WRIT PETITION) दाखल केलेली होती. त्यावर सुनावणी घेऊन मुंबई हायकोर्टाने सिंधुदुर्ग जिल्हा कलेक्टर यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान काही महिन्यांपूर्वी मुंबई महापालिकेने नारायण राणे यांच्या मुंबईतील ‘अदीश’ बंगल्यावर कारवाई केली होती. घराचे बांधकाम बेकायदेशीरपणे वाढवल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. याविरोधात नारायण राणे हे न्यायालयात गेले होते. तेव्हा न्यायालयाने राणेंच्या विरोधात निकाल देत अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते.