Download App

एक कोटी लाचेत नगरचा अधिकारी जाळ्यात : नांगरे पाटलांनी सांगितली कारवाईची इनसाईड स्टोरी

अहमदनगर : नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अहमदनगर आणि धुळे शहरांतीन दोन अधिकाऱ्यांना तब्बल एक कोटी रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईने दोन्ही शहरांत खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अहमदनगर कार्यालयातील सहाय्यक अभियंता अमित गायकवाड आणि धुळे कार्यालयातील कार्यकारी अभियंता गणेश वाघ या दोघांविरोधात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Anti-Corruption Bureau has arrested two officers red-handed while taking bribes worth Rs.1 crore)

दरम्यान, हा प्रकार नेमका काय होता? आणि कसा घडला? याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी माहिती दिली आहे. पाटील म्हणाले, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अहमदनगर कार्यालयातील सहाय्यक अभियंता आणि त्यांचा त्या काळातील उपअभियंता यांनी तक्रारदाराकडे एक कोटी लाचेची मागितली होती. तडजोडीतही एक कोटी रुपयांचीच मागणी कायम ठेवण्यात आली. यानंतर संबंधित शासकीय ठेकेदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. यात 22 ऑक्टोबरला पडताळणी झाली आणि त्यानंतर पुढील नियोजन आखण्यात आले.

राऊत कोणत्या हॉटेलमध्ये कोणाबरोबर थांबायचे? पुरावेच देतो; शिरसाटांचे थेट चँलेज

यानंतर शुक्रवारी (3 नोव्हेंबर) दुपारी सव्वा दोनच्या दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संबंधित सापळा रचून सहाय्यक अभियंता अमित गायकवाड याला रंगेहाथ अटक केली. तसेच तत्कालिन उपअभियंता आणि सध्या धुळे कार्यालयातील कार्यकारी अभियंता गणेश वाघ या दोघांविरोधात ही कारवाई करण्यात आली. याबाबतचे फोन रेकॉर्ड तपासले असता त्यातही हे दोघे दोषी आढळून आले, अशी माहितीही विश्वास नांगरे पाटील यांनी माध्यमांना बोलताना दिली.

Ahmednagar News : मराठवाड्याला पाणी सोडण्यापूर्वी प्रशासनाकडून ‘या’ भागांमध्ये जमावबंदी…

असा होता एक कोटी मागण्याचा हिशोब :

एमआयडीसीमधील मुळा डॅम ते देहरे या भागातील 1000 एम. एम. लोखंडी पाईपलाईनचे तब्बल 31 कोटींचे कंत्राट तक्रारदाराला मिळाले होते. या कामानंतर त्यांची सुरक्षा रक्कम 94 लाख, अनामत रक्कम एक कोटी 67 लाख आणि पेडिंग बिल 14.11 लाखांचे पेंडिंग बिल असे 2.66 कोटी रुपयांचे येणे बाकी होते. याशिवाय जे काम केले होते त्याबदल्यात आपल्याला काहीतरी बक्षीस मिळावे यासाठी संबंधित सहायक अभियंता तक्रारदाराला त्रास देत होता. या सगळ्या पैशांच्या बदल्यात तक्रारदाराकडून एक कोटी रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती.

Tags

follow us