Ahmednagar News : मराठवाड्याला पाणी सोडण्यापूर्वी प्रशासनाकडून ‘या’ भागांमध्ये जमावबंदी…

Ahmednagar News : मराठवाड्याला पाणी सोडण्यापूर्वी प्रशासनाकडून ‘या’ भागांमध्ये जमावबंदी…

Ahmednagar News : भंडारदरा(Bhandardara)/निळवंडे धरणातून (nilwande dam)पैठण धरणामध्ये प्रवरा नदीतून (Pravara River)सांडव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे. या‌दरम्यान प्रवरा नदीवरील नेवासा तालुक्यामधील पाचेगाव, पुनतगाव व मधमेश्वर कोल्हापूर बंधारा परिसरात जमावबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. नगर भागाचे उपविभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील (Sudhir Patil)यांनी जमावबंदी आदेश (Prohibition order)जारी केले आहेत.

राम मंदिरासाठी लढला, भगवा फडकवला अन् आता थेट तुरुंगात; शिवसेनेच्या माजी आमदाराला अटक

पैठण धरणामध्ये सोडलेले पाणी सुरळीतपणे जाण्यासाठी फळ्या (बर्गे) काढण्यात येणार आहेत. नदीपात्रामध्ये पाणी सोडल्यानंतर काही ठिकाणी कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यात शेतकरी बर्गे टाकण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. तसेच सदर प्रवाह कालावधीत लाभधारकांकडून अनिधकृत पाणी उपसा करण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

Maharashtra Kesari 2023: महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या तारखा जाहीर; पुण्यात रंगणार थरार

यासाठी नेमलेल्या क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दमदाटी मारहाण होवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. प्रतिबंधात्मक (जमावबंदी) आदेश लागलेल्या ठिकाणांवर कोणीही गर्दी करु नये म्हणून या ठिकाणी संचार, वाहतूक, फिरणे व या परिसरात प्रवाह कालावधीत पाच किंवा अधिक व्यक्तीस एकत्र येण्यास मनाई राहील. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तीच्या हालचालीवर फिरण्यावर या कालावधीत निर्बंध राहील.

या कालावधीत या ठिकाणांच्या आजुबाजूस 500 मीटरपर्यंतचे परिसरात कार्यकारी अभियंता, अहमदनगर पाटबंधारे विभाग, अहमदनगर अंतर्गत नियुक्त केलेले अधिकारी/कर्मचारी व वाहने यांना वगळता कोणालाही प्रवेश करता येणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube