राम मंदिरासाठी लढला, भगवा फडकावला अन् आता थेट तुरुंगात; शिवसेनेच्या माजी आमदाराला अटक

राम मंदिरासाठी लढला, भगवा फडकावला अन् आता थेट तुरुंगात; शिवसेनेच्या माजी आमदाराला अटक

लखनऊ : शिवसेनेचे माजी आमदार पवन पांडे (Pawan Pande) यांना उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) अटक केली आहे. बनावट कागदपत्र दाखवून आणि मुलाला व्यसन लावून आठ कोटी रुपयांची जमीन 20 लाख रुपयांना जबरदस्ती पद्धतीने बळकवल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणात जून 2022 मध्ये त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. गेल्या वर्षभरापासून त्यांचा शोध सुरु होता, त्यानंतर आता त्यांना अटक करण्यात आली असून पोलीस पुढील चौकशी करत आहेत. (Former Shiv Sena MLA Pawan Pandey has been arrested by the Special Task Force (STF) of the Uttar Pradesh Police)

काय आहे संपूर्ण प्रकरण

याबाबत अधिक माहिती अशी की, 5 जून 2022 रोजी, चंपा देवी यांनी आंबेडकरनगरमधील अकबरपूर कोतवाली येथे पवन पांडे, मुकेश तिवारी, गोविंद यादव यांच्यासह 12 जणांविरुद्ध फसवणूक आणि बनावटगिरीचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. पांडे यांच्यासह 12 आरोपांनी अकबरपूर-बसखारी राष्ट्रीय महामार्गालगत आठ कोटी रुपयांची जमीन हडप केली आणि त्यासाठी बनावट कागदपत्र सादर केली, असा आरोप त्यांच्यावर होता. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

Elon Musk: सबस्क्रिप्शननंतर एलॉन मस्कनं लढवली नवी शक्कल, X मधून ‘या’ प्रकारे करणार कमाई

या प्रकरणात, पवन पांडे यांनी आंबेडकरनगर महापालिकेच्या सर्वेक्षण अधिकाऱ्यांसोबत मिळून बनावट कागदपत्र तयार केली. यानुसार पीडित चंपा देवी यांचा मुलगा अजय सिंह याची पत्नी म्हणून आझमगढ येथील रहिवासी असलेल्या नीतू सिंगच्या नावाच्या महिलेची नोंद केली. यासाठी बाराबंकी येथील सफेदाबाद आर्य समाज मंदिराचे बनावट विवाह प्रमाणपत्र तयार करुन कागदपत्रांमध्ये लावण्यात आले. यानंतर पीडितेच्या कुटुंबात तिचे नाव रजिस्टर करण्यासाठी अर्जही दाखल करण्यात आला.

महादेव बेटिंग अॅपच्या प्रवर्तकाने CM भूपेश बघेलांना दिले 508 कोटी; ईडीचा खळबळजनक दावा

त्यानंतर अवघ्या 2 तासांनंतर, मुलाचा संशयास्पद परिस्थितीत अपघात झाला. याकाळात अजय सिंह याला अंमली पदार्थांचे व्यसन लावले गेले होते. मुलाच्या मृत्यूनंतर संबंधित जमीन त्या मुलीच्या नावे करण्यात आली आणि नंतर ती विकण्यातही आली, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. या दरम्यान, आता जर तिला किंवा तिच्या दोन मुली आणि जावई यांना काही झाले तर पवन पांडे आणि त्याचे सहकारी जबाबदार असतील, असेही पीडितेने म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube