Download App

Kalaram Mandir : वेदोक्त मंत्र वादावर महंत सुधीरदास यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अधिकार…

  • Written By: Last Updated:

 Kalaram Mandir Controversy :  गुरूवारी देशभरात रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी अनेक ठिकाणी या उत्सवाला दालबोट लागल्याचं पाहायला मिळालं. तर त्याचवेळी नाशिकमध्ये काळाराम मंदीरामध्ये मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोल्हापूरच्या गादीचे वंशज आणि माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांच्याबाबतीत एक अनुचित प्रकार घडल्याचं पाहायला मिळाला. याबद्दल स्वतः संयोगीताराजे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत माहिती दिली.

संयोगीताराजे छत्रपती यांना नाशिकमध्ये काळाराम मंदीरामध्ये पूजा करण्यासाठी गेल्या असता. त्यांना तेथील पुजाऱ्यांनी वेदोक्त मंत्रांचं पठण करण्यापासून रोखले. त्यावर त्यांनी तेथे संबंधितांना समज देत वेदोक्त मंत्रांसह पूजा केली. मात्र त्यांनी त्यांच्यासोबत अशा प्रकारे झालेल्या या भेदभावा बद्दल नाराजी व्यक्त करत इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केली आहे.

संजय राऊतांच्या जीभेला हाडच नाही… गिरीष महाजनांचा खोचक टोला

यानंतर मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संयोगिताराजे यांनी केलेले आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत. अधिकार वगैरे असे कुठलेही वाक्य बोललेलो नाही. संयोगिताराजे यांना अपमान झालेला वाटत असेल तर त्यांची दिलगिरी व्यक्त करतो, असे मंदिराचे महंत सुधीरदास म्हणाले आहेत.

Kalaram Mandir : संयोगिताराजे भोसलेंचा अपमान करणाऱ्या महंतांवर कारवाई करा!

दरम्यान, संयोगिताराजे यांनी आपल्या पोस्टमध्ये त्याची माहिती दिली होती. ‘हे श्रीरामा, स्वतःला सर्वज्ञ समजून, माणसा-माणसात भेद निर्माण करणार्‍या,परमेश्वराच्या नावाने केवळ स्वार्थ साधू पाहणार्‍यांना सद्बुद्धि दे… हीच आमची प्रार्थना,अन हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे.. आपण सर्वजण देवाची लेकरे….आणि लेकरांनी आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी कोणाची परवानगी कशाला हवी? असे त्या म्हणाल्या आहेत.

Tags

follow us