नाशिक SIT ची मुंब्य्रात फिल्मीस्टाइल रेकी! पती सापडला, निदा खान निसटली आता ॲट्रॉसिटीही दाखल

Nashik SIT Nida Khan नाशिक प्रकरणात कंपनीतील एचआर मॅनेजर निदा खान हीचा या प्रकरणामध्ये थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Nashik TCS Conversion Case

Nashik TCS Conversion Case

Nashik SIT’s film style raid in Mumbrah! Husband found, Nida Khan escapes now atrocity filed : नाशिकमध्ये इंटरनॅशनल आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS मध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषणासह कथित धर्मांतरणाच्या प्रकरणात कंपनीतील एचआर मॅनेजर निदा खान हीचा या प्रकरणामध्ये थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र ती गेल्या 20-22 दिवसांपासून फरार आहे.

पुणे विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात; विमानसेवेबाबत केंद्रीय मंत्री मोहोळ यांची मोठी माहिती…

यासाठी नाशिक एसआयटीने थेट मुंब्रा गाठत शुक्रवारी सकाळपासून फिल्मी स्टाईल रेकी केली. निदा खान राहत असलेल्या मुंब्रातील एका भागात यासाठी पथकातील तीन कर्मचारी दुसरा काहीतरी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिच्या घरी पोहोचले. मात्र दोघेही त्या ठिकाणी सापडले नाहीत. यावेळी तिचा पती मोईन खान कामावर गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला कंपनीतून ताब्यात घेतलं. मात्र फरार असलेली निदा खान पोलिसांच्या हाती लागली नाही. मात्र पती मोहीम खानची चौकशी करतात त्याने निदाची मावशी नुरी शेख तिला नाशिकला घेऊन गेल्याचं सांगितलं आहे.

कशी असणार वैशाख महिन्याची सुरूवात? जाणून घ्या बाराही राशींचं आजचं राशी भविष्य

दुसरीकडे या प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात आता ॲट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निदा खान, दानिश शेख आणि तौसिफ अत्तार या तिघांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला ही एसी प्रवर्गातील असल्याने तिला जातीवाचक शिवीगाळ केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात ॲट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version